मुंबई : टीम इंडियाच्या (Team India) वरिष्ठ खेळाडूंबाबत आतापर्यंत अनेकांनी भविष्यवाणी व्यक्त केली आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) टीम इंडियामध्ये अनुभवी फलंदाज होते. सुरुवातीच्या काही मॅचमध्ये टीम इंडियाने चांगली फलंदाजी केली. परंतु इंग्लंडविरुद्धच्या (England) सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. त्यामुळे टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंवर अनेकांनी प्रश्वचिन्ह उपस्थित केलं आहे. दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, कर्णधार रोहित शर्मा हे खेळाडू वरिष्ठ असल्याने टीकेचे धनी ठरले आहेत. इंग्लंडचा माजी खेळाडू मोंटी पानेसर याने विराट कोहली आणि रोहित शर्मा याच्याबाबत भविष्यवाणी व्यक्त केली आहे.
टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंनी आता खरंच विचार करण्याची वेळ आली आहे. कारण ज्यावेळी तुम्ही इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलची मॅच खेळत होता. त्या मॅचमध्ये 168 ही धावसंख्या कमी नव्हती. गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करणं भाग होतं. परंतु टीम इंडियाच्या गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही असंही मोंटी पानेसर म्हणाला.
रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि आर अश्विन या तीन खेळाडूंनी तात्काळ T20 फॉरमॅट मधून निवृत्ती घ्यावी. या तीन खेळाडूंसोबत आता मॅनेजमेंट बैठक घेईल, तेव्हा ते तिन्ही खेळाडूंना विचारेल की, तुमचा पुढचा प्लॅन काय आहे. आता युवा खेळाडूंना संधी देण्याची गरज आहे.
विराट कोहलीच वय म्हणजे एक नंबर आहे. तो आतापर्यंत नेहमी फीट राहिला आहे. पुढच्या T20 विश्वचषक स्पर्धेत तो नक्की खेळताना दिसेल. रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि आर अश्विन मोहम्मद शमी या खेळाडूंनी एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटकडे लक्ष द्यायला हवं असं धक्कादायक वक्तव्य मोंटी पानेसर याने केले आहे.