मुंबई: अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या (World Championships) अंतिम फेरीत भारतही पदकासाठी खेळणार आहे. मुरली श्रीशंकर (Murali Sreeshankar) आणि अविनाश साबळे (Avinash Sable) यांनी अनुक्रमे पुरुषांच्या लांब उडी आणि 3000 मीटर स्टीपल चेसच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलय. या मोसमात मुरली श्रीशंकर सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. त्याने थेट 8 मीटर पर्यंत लांब उडी मारुन फायनलसाठी पात्र ठरला. ऑल्ड्रिन 7.79 मीटर आणि अनीस यांनी 7.73 मीटर अंतरापर्यंत उडी मारली. अंतिम फेरीत मुरली श्रीशंकर डार्क हॉर्स ठरु शकतो. तो फायनल मध्ये पदकविजेती कामगिरी करु शकतो. मे महिन्यात त्याने 8.36 मीटर अंतरापर्यंत उडी मारली होती. वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये लांब उडीच्या प्रकारात अंतिम फेरीत पात्र ठरणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे.
3000 मीटर स्टीपल चेसच्या मध्ये भारतीय लष्करातील अविनाश साबळे 8:18.75 या वेळेसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. पात्रता फेरीत तो तिसऱ्या स्थानावर राहिला.
“ऑलिम्पिक स्पर्धेनंतर मी घरीच होतो. मी शेती केली. कोविड झाल्यामुळे माझी तब्येत बरी नव्हती. माझ्या मध्ये बराच अशक्तपणा होता. 8 मिनिट 30 सेकंद धावू शकीन, असं मला वाटतं नव्हतं. एका टप्प्यावर ऑलिम्पिंक मधून माघार घ्यावी असाही विचार माझ्या मनात आला. पण कोचनी ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणं, किती महत्त्वाचं आहे, ते मला पटवून दिलं. जर तुला संधी मिळतेय, तर का सोडतोस? असा त्यांचा प्रश्न होता. ऑलिंम्पिक मध्ये चांगली कामगिरी करण्याचा विश्वास माझ्यामध्ये नव्हता. मी निराश होतो” असं साबळे इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाला.