Nisha Dahiya | राष्ट्रीय कुस्तीपटू निशा दहिया ठणठणीत, हत्या झाल्याची अफवा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

| Updated on: Nov 10, 2021 | 7:46 PM

राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू निशा दहिया ठणठणीत असून तिची हत्या झालेली नाही. यापूर्वी तिची गोळ्या झाडून हत्या झाल्याची अफावा पसरली होती.

Nisha Dahiya | राष्ट्रीय कुस्तीपटू निशा दहिया ठणठणीत, हत्या झाल्याची अफवा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
NISHA DAHIYA
Follow us on

चंदीगड : राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू निशा दहिया ठणठणीत असून तिची हत्या झालेली नाही. यापूर्वी तिची गोळ्या झाडून हत्या झाल्याची अफावा पसरली होती. या अफवेनंतर निशा दहियाने एक व्हिडीओ शेअर करत मी ठणठणीत असल्याचे सांगितले आहे. हा व्हिडीओ भारतीय कुस्ती महासंघाकडून जारी करण्यात आला असून आगामी सामना पूर्ण क्षमतेने खेळणार निशा सांगताना दिसतेय.

गोळ्या झाडून हत्या झाल्याची पसरली होती अफवा

राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू निशा दहिया हिची गोळ्या झाडून हत्या झाल्याची अफवा पसरली होती. अज्ञातांनी तिच्यावर अचानकपणे हल्ला करुन तिच्यावर गोळ्या झाडल्या. तसेच या हल्ल्यात तिचा भावाचादेखील मृत्यू आणि आई गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र ही नुसतीच अफवा असून  कुस्तीपटू निशा दहिया ही ठणठणीत असल्याचे समोर आले आहे. ती सध्या तिच्या आगामी सामन्याची तयारी करत आहे. तिच्या हत्येचे वृत्त प्रसिद्ध होताच निशाने भारतीय कुस्ती महासंघाच्या माध्यमातून एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. यामध्ये तिने आपण ठणठणीत अलल्याचे सांगितले आहे. तसेच माझ्या घरातील सदस्यदेखील सुरक्षित असून त्यांना काहीही झालेले नसल्याचे तिने म्हटले आहे.

हत्या नेमकी कोणाची झाली ?

यापूर्वी हरियाणा येथील एका महिला पैलवानाची हत्या झाली होती. या महिला पैलवानासोबतच तिचा भाऊ आणि आईवरदेखील गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यामध्ये निशा पैलवान तसेच तिच्या भावाचा मृत्यू झाला. तर तिची आई गंभीर जखमी झाली आहे. सोनीपूरमधील हलालपूर गावात ही घटना घडली. हत्या झालेली महिला पैलवान आणि कुस्तीपटून निशा यांचे नाव सारखेच असल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. परिणामी कुस्तीपटून निशा दहियाची हत्या झाल्याची अफवा पसरली.

इतर बातम्या :

तेव्हा मान वर करायलाही वेळ मिळाला नाही, आता मानेचं दुखणं वाढलंय: मुख्यमंत्री

ICC T20 Rankings: श्रीलंकेचा वानिंदु हसारंगा पहिल्या स्थानावर कायम, ‘टॉप 10’ मध्ये एकही भारतीय नाही

VIDEO: मूर्ती लहान पण किर्ती महान, केवाय वेंकटेश यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रपती उतरले मंचावरुन खाली