मुंबई: वर्ल्ड एथलॅटिक्सि चॅम्पियनशिप स्पर्धेत नीरज चोप्राने (Neeraj Chopra) आज ऐतिहासिक कामगिरी केली. भालाफेकीत नीरजने रौप्यपदकाला गसवणी घातली. अंजू बॉबी जॉर्ज नंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक विजेती कामगिरी करणारा नीरज चोप्रा दुसरा भारतीय क्रीडापटू आहे. तब्बल 19 वर्षानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप (World championship) मध्ये भारताला पदक मिळालं आहे. नीरजच्या या प्रदर्शनावर आई सरोज देवी (Saroj Devi) यांनी आनंद व्यक्त केला. नीरजने पदक जिंकल्याचं ऐकून खूप चांगल वाटतय, असं त्या म्हणाल्या. आम्हाला विश्वास होता, तो पदक जिंकणार, त्याची मेहनत पूर्ण झाली. विश्व एथलॅटिक्स चॅम्पियनशिप मध्ये मेडल जिंकणारा नीरज पहिला भारतीय पुरुष क्रीडापटू आहे.
त्याने 88.13 मीटर अंतरावर भालाफेकून रौप्यपदक निश्चित केलं. याआधी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत 2003 साली अंजू बॉबी जॉर्जने लांब उडीत कास्य पदक विजेती कामगिरी केली होती. या महत्त्वाच्या स्पर्धेत नीरजने फाऊलने सुरुवात केली होती. पण दुसऱ्याप्रयत्नात त्याने 82.39 मीटर अंतरावर भालाफेकून कमबॅक केलं. तिसऱ्या प्रयत्नात 86.37 आणि चौथ्या प्रयत्नात 88.13 मीटर अंतरावर थ्रो करुन रौप्यपदक निश्चित केलं.
बहुत अच्छा लग रहा है, हमें उम्मीद थी कि वो मेडल जरूर जीतेगा और उसकी मेहनत पूरी हुई: विश्व एथलेटिक्स चैंपियनशिप में नीरज चोपड़ा के रजत पदक जीतने पर उनकी मां (सरोज देवी),पानीपत, हरियाणा pic.twitter.com/YD7FwNYC9Q
— ANI_HindiNews (@AHindinews) July 24, 2022
ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने 90.46 मीटर अंतरावर थ्रो करुन सुवर्णपदाकाला गवसणी घातली. चेक गणराज्यच्या याकूब वालडेशने कांस्य पदक विजेती कामगिरी केली. भारताच्या रोहित यादवने 78.72 मीटर अंतरावर थ्रो केला. त्याला 10 वं स्थान मिळालं.