पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या एथलीट्ससाठी हरियाणा सरकारने आपला खजिना उघडलाय. हरियाणा सरकारने पॅरिस ऑलिम्पिकमधील पदक विजेत्या खेळाडूंना इनामी रक्कम जाहीर केलीय. देशासाठी एकमेव रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला मनु भाकरपेक्षा एक कोटी रुपये कमी मिळाले आहेत. हरियाणा सरकारने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल जिंकणाऱ्या मनु भाकरला इनाम म्हणून 5 कोटी रुपये दिले आहेत. मनु भाकरने 10 मीटर एयर पिस्तुलच्या सिंगल्स इवेंट आणि मिक्स्ड टीम इवेंटमध्ये ब्रॉन्ज मेडल मिळवलं.
नीरज चोप्राला हरियाणा सरकारने 4 कोटी रुपये दिले. मनु भाकरपेक्षा 1 कोटी रुपये त्याला कमी मिळाले आहेत. नीरज चोप्राने जॅविलन थ्रो मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल मिळवलं. फायनलमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक विजेती कामगिरी केली. पण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून सर्वात चांगली कामगिरी नीरज चोप्राने केली. नीरज चोप्राला मनु भाकरपेक्षा 1 कोटी रुपये कमी मिळण्याच कारण हे सुद्धा आहे की, मनूने ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवली. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात एका खेळाडूने दोन पदकं जिकण्याची ही पहिलीच वेळ आहे. हरियाणा सरकारने ब्रॉन्ज मेडलिस्टसाठी 2.5 कोटी रुपये देण्याच जाहीर केलं होतं. दोन मेडल्समुळे मनुला 5 कोटी रुपये मिळाले.
नीरज-मनूशिवाय अजून कुठल्या खेळाडूंना मिळाले कोट्यवधी रुपये?
हरियाणा सरकारने अजून दोन खेळाडूंना कोट्यवधी रुपये दिले आहेत. मनु भाकरसोबत ब्रॉन्ज मेडल जिंकणाऱ्या सरबजोत सिंहला इनाम म्हणून 2.5 कोटी रुपये देण्यात आले आहेत. कुस्तीमध्ये ब्रॉन्ज मेडल जिंकणाऱ्या अमन सहरावतला सुद्धा 2.5 कोटी रुपये दिले आहेत. अमनने प्यूर्टो रिकोच्या डेरियन क्रूजला हरवून ब्रॉन्ज मेडल मिळवलं.