नवी दिल्ली : खेळात सातत्याचा विषय असेल, तर येणाऱ्या पिढ्यांना नीरज चोपडाच उद्हारण जरुर दिलं जाईल. भारताच्या भालाफेकपटूने तो करिष्मा करुन दाखवलाय. जे देशाच्या इतिहासात याआधी कधी झालं नव्हता. सातवर्षापूर्वी जूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडलपासून विजयाचा हा सिलसिला सुरु झाला. नीरजने बुडापेस्ट सीनियर वर्ल्ड चॅम्पिपयनशिप जिंकून नवीन इतिहास रचला. ऑलिम्पिकमध्ये नीरजने आपला जो जलवा दाखवला होता, तोच आवेश बुडापेस्टमध्ये दिसून आला. नीरजला यामध्ये स्टेडियममध्ये बसलेल्या हजारो प्रेक्षकांची साथ मिळाली.
रविवारी 27 ऑगस्ट रोजी नीरजने बुडापेस्टमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या जॅवलिन थ्रो फायनलमध्ये गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला. नीरजने 88.17 मीटर अंतरावर थ्रो करुन करिअरमध्ये पहिल्यांदा गोल्ड मेडल जिंकलं. हे फक्त नीरजच्या करिअरमधील नाही, तर भारताच्या इतिहासातील एथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील पहिलं गोल्ड मेडल आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन गोल्ड मेडल जिंकणारा पहिला भारतीय एथलीट बनलाय.
पहिल्या प्रयत्नात नीरज सर्वात शेवटी
नीरजला सुरुवातीपासून किताबासाठी दावेदार मानल जात होतं. पण त्याची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्याने पहिल्या प्रयत्नात फाऊल म्हणजे चूक केली. फायनलमध्ये एकूण 12 थ्रोअर होते. त्यात नीरज शेवटला होता. एका प्रयत्नात जो पराभूत होईल, तो नीरज चोपडा कुठला. 25 वर्षाचा भारतीय स्टार नीरजने पुढच्याच थ्रो मध्ये 11 फायनलिस्टना असं मागे टाकलं की, नतंर कोणी त्याच्या पुढे जाऊ शकलं नाही.
हजारो प्रेक्षकांमध्ये संचारला उत्साह
दुसऱ्या प्रयत्नात ऑलिम्पिक चॅम्पियन नीरजने जो थ्रो केला, त्यानंतर मागे वळून पाहण्याची गरज उरली नाही. नीरजने थ्रो पूर्ण केल्यानंतर प्रेक्षकांकडे पाहून ओरडला व हात हवेत उंचावला. ऑलिम्पिक फायनलमध्ये सुद्धा नीरजने असंच केलं होतं. नीरजचा हा जोश पाहून स्टेडियममध्ये बसलेल्या हजारो प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला. प्रत्येक जण आपल्या जागेवर उठून जोरजोरात टाळ्या वाजवू लागला.
88.17 Meters for 🥇
Neeraj Chopra becomes 1st 🇮🇳 athlete to win a gold medal at the #WorldAthleticsChampionships 😍
Watch the best of #Budapest23 – FREE only on #JioCinema ✨#WAConJioCinema pic.twitter.com/le562o9zp2
— JioCinema (@JioCinema) August 27, 2023
नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 88.17 मीटर अंतरावर थ्रो केला. क्वालिफायिंगमध्ये नीरजने 88.77 मीटर अंतरावर थ्रो केला होता. त्यापेक्षा हे अंतर कमी होतं. पण नीरजला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यासाठी पुरेस होतं. पुढच्या चार प्रयत्नात नीरज 88.17 मीटर हे अंतर पार करु शकला नाही. नीरजच्या शानदार करिअरमध्ये आणखी एक उपलब्धिक जोडली गेलीय. भारताला नवीन वर्ल्ड चॅम्पियन मिळालाय.