Nita Ambani : नीता अंबानी यांचा जगभरात ‘जलवा’, या स्पर्धेच्या सदस्यत्वसाठी मिळाली शंभर टक्के मते

| Updated on: Jul 26, 2024 | 8:51 AM

Olympic Games Paris 2024 neeta ambani: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नीने या खास प्रसंगी घालण्यासाठी लक्झरी ब्रँड चॅनेलचा ब्लेझर निवडला. त्या आलिशान ब्लेझरची किंमत १.५७ लाख रुपये आहे. नुकतेच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्या १२ ते १४ जुलै दरम्यानच्या लग्न समारंभात तो पूर्णपणे भारतीय पारंपारिक पोशाख परिधान केला होता.

Nita Ambani : नीता अंबानी यांचा जगभरात जलवा, या स्पर्धेच्या सदस्यत्वसाठी मिळाली शंभर टक्के मते
neeta ambani
Follow us on

Nita Ambani Re-elected as IOC Member: रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा, मुंबई इंडियन्सच्या मालक आणि मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी जगभरात लोकप्रिय आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसाठी त्यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे या निवडीसाठी त्यांना शंभर टक्के राष्ट्रांचा म्हणजे सर्वच्या सर्व 93 मतांचा पाठिंबा मिळाला. भारताकडून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य त्या बनल्या आहेत. 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये नीता अंबानी यांना पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकचे सदस्य बनवण्यात आले होते. या प्रकारे 8 वर्षांनंतर त्यांना दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाला आहे.

नीता अंबानींच्या त्या ब्लेझरची किंमत १.५७ लाख रुपये

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नीने या खास प्रसंगी घालण्यासाठी लक्झरी ब्रँड चॅनेलचा ब्लेझर निवडला. त्या आलिशान ब्लेझरची किंमत १.५७ लाख रुपये आहे. नुकतेच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्या १२ ते १४ जुलै दरम्यानच्या लग्न समारंभात तो पूर्णपणे भारतीय पारंपारिक पोशाख परिधान केला होता.

हे सुद्धा वाचा

नीता अंबानी यांनी मानले आभार

रिलायन्स फाउंडेशनने या सन्मानाची माहिती रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य म्हणून पुन्हा निवडून आल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. मी अध्यक्ष थॉमस बाख आणि आंतरराष्ट्रीय ऑल्मिपक संघटनेमधील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानते. ही निवडणूक केवळ वैयक्तिक मैलाचा दगड नाही तर जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताच्या वाढत्या प्रभावाची ओळख आहे. आनंदाचा आणि अभिमानाचा हा क्षण मी प्रत्येक भारतीयासोबत शेअर करतो. भारत आणि जगभरातील ऑलिम्पिक चळवळीला बळकटी देण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील.

आयओसी अध्यक्ष थॉमस बाख आणि नीता अंबानी

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे मालकीन

आयपीएलच्या सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सचे मालकी हक्क नीता अंबानी यांच्याकडे आहेत. इंडियन सुपर लीग चालवणाऱ्या फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडच्या त्या संस्थापक आणि अध्यक्षा देखील आहेत. रिलायन्स फाऊंडेशन यंग चॅम्प्स ही अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून 5 स्टार रेटिंग मिळवणारी पहिली आणि एकमेव तरुण अकादमी आहे. क्रिकेटमध्ये आयपीएल संघ मुंबई इंडियन्सचा मालक असण्याबरोबरच, तो मुंबई इंडियन केपटाऊन (2022) आणि MI Emirates (2022) आणि मुंबई इंडियन्स महिला संघ (2023) या लीग क्रिकेट संघांचा सहमालक देखील आहे.