रिओ : अमेरिकन देशातील सर्वात मानाची आणि महत्त्वाची फुटबॉल स्पर्धा असणाऱ्या कोपा अमेरिका चषकाचा अंतिम सामना (Copa America 2021 Final) अखेर पार पडला. अनेक वर्षांपासून कोपा अमेरिका स्पर्धा गाजवणारे अर्जेंटीना आणि ब्राझील हे संघ आमने-सामने होते. त्यात दोन्ही संघातील महत्त्वाचे खेळाडू ही फुटबॉल जगतातील बेस्ट खेळाडू लिओनल मेस्सी (Lionel Messi) आणि नेयमार (Neymar) असल्याने या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात अखेर मेस्सीच्या अर्जेंटीना संघाने 1-0 च्या फरकाने विजय मिळवत सामना आपल्या नावे केला. (Argentina FC Won Copa America against Brazil in FInal With 1-0 score)
नेमार आणि मेस्सी सोडता दोन्ही संघाकडे उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा होता. ज्यात ब्राझीलकडे थियागो सिल्वा, फ्रेड, कॅसमिरोसारखे खेळाडू होते. तर अर्जेंटीनाकडे मेस्सीसह डी मारीया, पॅरडेज, लुईस मार्टीनेजसारखे तगडे खेळाडू होते. त्यामुळे या सामन्याकडे सर्वच फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागून होते. सामना सुरुवातीपासूनच चुरशीचा सुरू होता. दोन्ही संघ एकमेकांना तोडीस तो़ खेळ करत होते. अखेर २२ व्या मिनिटाला अर्जेंटीनाच्या एंजल डी. मारिया (Angel DI maria) याने पहिला गोल नोंदवत अर्जेंटिनाला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ब्राझीलला एकही गोल करता न आल्याने अखेर सामना 1-0 च्या फरकाने अर्जेंटीनाने जिंकत स्पर्धाही आपल्या नावे केली.
¡FINAL DEL PARTIDO! @Argentina venció 1-0 a Brasil con gol de Ángel Di María
FIM DO JOGO! Argentina venceu por 1-0 do @cbf_futebol com gol de Ángel Di María
?? Argentina ? Brasil ??#VibraElContinente #VibraOContinente pic.twitter.com/v1VF5parZ8
— Copa América (@CopaAmerica) July 11, 2021
कोपा अमेरिका स्पर्धेचा इतिहास पाहता ब्राझील संघाचा पगडा अर्जेंटीनावर भारी राहिला आहे. 2019 च्या सेमीफायनलमध्ये दोन्ही संघ आमने सामने असताना ब्राझीलने अर्जेंटीनावर 2-0 ने विजय मिळवला होता. ब्राझील आणि अर्जेंटीना आतापर्यंत तब्बल 111 वेळा फुटबॉलच्या मैदानावर एकमेंकाशी भिडले आहेत. ज्यात अर्जेंटीनाने 46 सामने जिंकले आहेत. तर ब्राझीलने 40 सामन्यांत विजय मिळवला आहे. तसेच 25 सामने ड्रॉ देखील झाले आहेत. कोपा अमेरिका स्पर्धेचा विचार करता मागील 5 सामन्यांत ब्राझील अर्जेंटीनावर भारी असून पाचपैकी ब्राझीलने 4 तर अर्जेंटीनाने 1 सामना जिंकला होता. पण यंदा अर्जेंटीनाने दिमाखात अंतिम सामना जिंकत खिताब आपल्या नावे केला.
माराकोना स्टेडियमवर अर्जेंटीना संघाची हा सलग 20 वा विजय होता. या विजयासह अर्जेंटीनाने 1993 नंतर पहिल्यांदा कोपा अमेरिका चषक जिंकला आहे. त्यामुळे 28 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मेस्सीने देशाला हा बहुमान मिळवून दिला. मेस्सीचाही हा पहिलाच मोठा आंतरराष्ट्रीय चषक असल्याने त्याच्यासाठीही हा विजय अत्यंत महत्त्वाचा ठरला. या विजयासह अर्जेंटिनानं 15 वेळा किताब जिंकण्याच्या उरुग्वेच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.
हे ही वाचा :
Euro 2020 : 13 वर्षांपूर्वीचा बदला घेत इटलीची स्पेनवर मात, अंतिम सामन्यात इटली दिमाखात दाखल
(Argentina FC Won Copa America against Brazil in FInal With 1-0 score)