Asian Champions Trophy hockey: सेमीफायनलमध्ये भारताला जपानकडून पराभवाचा धक्का, आज पाकिस्तान विरुद्ध सामना

| Updated on: Dec 22, 2021 | 10:11 AM

जपानला सहा पेन्लटी कॉर्नर मिळाले. पण त्यांना एकाच कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करता आले. दुसऱ्या सत्रात भारताने जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना जपानची बचावफळी भेदता आली नाही. प

Asian Champions Trophy hockey: सेमीफायनलमध्ये भारताला जपानकडून पराभवाचा धक्का, आज पाकिस्तान विरुद्ध सामना
(Twitter/Hockey India)
Follow us on

ढाका: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी (Asian Champions Trophy hockey) स्पर्धेत भारताला पराभवाचा झटका बसला आहे. तीन वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या भारताने आव्हान उपांत्यफेरीत संपुष्टात आले. बलाढ्य भारतीय हॉकी संघाला (Indian hockey team) जपानाने 5-3 ने पराभूत केले. बांगलादेशात ढाका येथे ही स्पर्धा सुरु आहे. साखळी गटात चार सामन्यात तीन विजयासह भारत अव्वल स्थानी होता. पण जपानने (Japan) आपल्या दर्जेदार खेळाने भारताला निष्प्रभ केले.

आज तिसऱ्या स्थानासाठी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध लढत होणार आहे. 2018 मध्ये भारत आणि पाकिस्तान दोघांनी संयुक्तरित्या या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. दक्षिण कोरिया विरुद्ध झालेल्या उपांत्यफेरीच्या दुसऱ्या लढतीत पाकिस्तान पराभूत झाला. रोमांचक सामन्यात दक्षिण कोरियाने पाकिस्तानला 6-5 ने पराभूत केले. जपान विरुद्धच्या सामन्यात भारताचे काही स्टार खेळाडू खेळत नव्हते.

जपानला सहा पेन्लटी कॉर्नर मिळाले. पण त्यांना एकाच कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करता आले. दुसऱ्या सत्रात भारताने जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना जपानची बचावफळी भेदता आली नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये भारत 0-2 ने पिछाडीवर होता. यामादाने पेनल्टी कॉर्नरवर जपानला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर फुजीशिमाने दुसरा गोल करत आघाडी 2-0 ने वाढवली. जपानच्या खेळापुढे भारतीय हॉकी संघ त्या तोडीचा खेळ करु शकला नाही. अखेर हा सामना जपानने 5-3 ने जिंकला.

संबंधित बातम्या:

पतंग उडवताना बाळाच्या आयुष्याची दोरी तुटली…दोन मिनिटांत होत्याचे नव्हते!
Aurangabad MNS: सुहास दाशरथे गटाला आणखी एक धक्का, चार कार्यकर्त्यांची मनसेतून हकालपट्टी, बदनामीचा ठपका
उत्तर प्रदेशनंतर केंद्रातही सत्ता परिवर्तन, नरेंद्र मोदी यूपीत आठ आठ दिवस मुक्काम टाकून बसलेत, संजय राऊत यांच्याकडून पश्चिम बंगालचा दाखला