Asian Games 2023 : भारताचा ‘निशाणा’ लागला, दोन पदक जिंकले; आशियाई स्पर्धेत ‘चांदी’

| Updated on: Sep 24, 2023 | 8:38 AM

चीनमध्ये आशियाई स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत जगभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. भारतानेही या स्पर्धेत भाग घेतला असून स्पर्धा सुरू होताच भारताने दोन पदके जिंकून जगासमोर तगडं आव्हान निर्माण केलं आहे.

Asian Games 2023 : भारताचा निशाणा लागला, दोन पदक जिंकले; आशियाई स्पर्धेत चांदी
asian games 2023
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीजिंग | 24 सप्टेंबर 2023 : चीनमध्ये सुरू झालेल्या एशियन गेम्स 2023 म्हणजे आशियाई स्पर्धेत भारताने सकाळी सकाळीच बोहणी केली आहे. भारताने या स्पर्धेत दोन मेडल जिंकले आहेत. दोन्ही सिल्व्हर मेडल आहेत. भारताने या स्पर्धेत पहिलं मेडल निशानेबाजीत जिंकलं आहे. तर दुसरं मेडल मेंस डबल्स लाइटवेट स्कलमध्ये मिळवलं आहे. ही दोन्ही पदके जिंकून भारताने पदक तालिकेत आपलं नाव समाविष्ट केलं आहे. आशियाई स्पर्धा सुरू होताच भारताने दोन पदके जिंकल्याने या स्पर्धेत भारताला आणखी पदके मिळण्याची शक्यता बळावली आहे.

महिलांच्या 10 मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये भारताला रजत पदक मिळालं आहे. तर दुसरं मेडल हे स्कलमध्ये जिंकलं आहे. लाइव्हेट कॅटेगिरीत भारतीय पुरुषांनी पदक जिंकून तिरंगा फडकवला आहे. भारतासाठी ही दोन्ही पदके महत्त्वाची आहेत. त्यामुळे इतर भारतीय खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळणार आहे.

तिघींची दमदार कामगिरी

भारताने दोन पदके जिंकून आशियाई स्पर्धा 2023च्या पदक तालिकेत नाव समाविष्ट केलं आहे. भारताच्या रमिता, मेहुली आणि आशी या तिन्ही महिला स्पर्धकांनी 10 मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये रजत पदक जिंकलं आहे. तिघांनी मिळून 1886 अंक मिळवले आहेत. यात रमिताने 631.9 पॉइंट मिळवले. मेहुलीने 630.8 तर आशीने 623.3 पॉइंट मिळवले आहेत. त्यामुळे भारताला हे पदक जिंकता आलं आहे.

डबल्स स्कलमध्ये धमाका

निशानेबाजीत भारताने सिल्व्हर मेडल जिंकल्याने भारताच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पदक मिळाल्याचं सेलिब्रेशन सुरू असतानाच त्यात आणखी एका आनंदाची भर पडली. भारताने डबल्स स्कलमध्ये आणखी एक पदक मिळाल्याने भारताचा आनंद गगनात मावेनासा झाला. यात पुरुषांच्या लाइटवेट कॅटेगिरीत भारताच्या अर्जुन सिंग आणि जट सिंग यांनी 6:28:18 ची वेळ काढत रजत पदक जिंकलं. या इव्हेंटमध्ये चीनने गोल्ड मेडल जिंकलं आहे.

आणखी पदकाची शक्यता

चीनच्या हांगजोऊ एशियन गेम्समध्ये भारताकडून 655 खेळाडू भाग घेत आहेत. भारतीय खेळाडू एकूण 40 स्पर्धांमध्ये भाग घेऊन आव्हान देणार आहेत. भारताने निशानेबाजीत पदक जिंकलं असून आता तलवारबाजी आणि स्विमिंगमध्येही भारताला पदक मिळण्याची शक्यता आहे. मुष्टियुद्धातही भारताला पदक मिळण्याची शक्यता आहे.