रशियाचा स्टार टेनिसपटू डॅनिल मेदवेदेवने (daniil medvedev) अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात जगातील नंबर एकचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच (Novak Djokovic) याला 6-4, 6-4, 6- 4 च्या फरकाने सरळ तीन सेट्ममध्ये मात दिली. या विजयासह त्याने आयुष्यातील पहिले ग्रँडस्लॅम मिळवलं आहे.
डॅनिल मेदवेदेवचा जन्म मॉस्कोमध्ये झाला होता. त्याचे वडिल कंप्यूटर इंजीनियर होते. मेदवेदेवच्या आईने त्याला टेनिस शिकण्यासाठी एका क्लबमध्ये घातलं. तिथून डॅनिलचं टेनिस करीअर सुरु झालं. गणित आणि भौतिकशास्त्रात पदवीचं शिक्षण घेणारा डॅनिल टेनिससाठी शिक्षण मध्येच सोडून फ्रान्सला गेला. त्याठीकाणी तो टेनिसचा सराव करु लागला.
ग्रँडस्लॅम या भव्य स्पर्धेत डॅनिल केवळ पाच वर्ष जुना आहे. त्याने 2017 मध्ये पहिल्यांदा विम्बल्डनच्या रुपात पहिल्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यावेळी त्याने पहिल्या फेरीत त्यालवेळी टेनिस जगतात नंबर तीनवर असणाऱ्या स्टान वावरिंकाला मात दिली होती.
मेदवेदेवने 2019 मध्ये पहिल्यांदा टॉप 10 मध्ये जागा मिळवली. ज्यानंतर आज त्याने 20 ग्रँडस्लॅम पटकावणाऱ्या नोव्हाकला नमवत आयुष्यातील पहिलं ग्रँडस्लॅम मिळवलं आहे.
टेनिस विश्वात आतापर्यंत राफेल नदाल आणि रॉडर फेडरर या दिग्गजांसह नोव्हाकनेही 20 ग्रँडस्लॅम पटकावले आहेत. त्यानंतर आजची स्पर्धा जिंकताच नोव्हाक 21 म्हणजेचत सर्वाधिक पदकं मिळवण्यात यशस्वी झाला असता. पण डॅनिलने त्याला ही कामगिरी करण्यापासून रोखलं.