Euro 2020 : इंग्लंडची क्रोएशियावर मात, ऑस्ट्रियाचाही जबरदस्त विजय

| Updated on: Jun 14, 2021 | 12:30 PM

रविवारी झालेल्या सामन्यांमध्ये इंग्लंडने क्रोएशियावर विजय मिळवला. तर ऑस्ट्रियाने नॉर्थ मेसेडोनियाच्या संघाला पराभूत करत पहिला विजय नोंदवला.

Euro 2020 : इंग्लंडची क्रोएशियावर मात, ऑस्ट्रियाचाही जबरदस्त विजय
इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया सामन्यातील एक क्षण
Follow us on

रोमानिया : यूरो चषक 2020 (Euro Cup 2020) स्पर्धेत रविवारी तीन सामने झाले. यातील सर्वात तगड्या संघात म्हणजे इंग्लंड आणि क्रोएशिया (England vs Croatia) यांच्यातील सामना इंग्लंडने जिंकला. चूरशीच्या झालेल्या सामन्यात अवघ्या एका गोलच्या जोरावर इंग्लंडने 1-0 ने सामन्यात विजय मिळवला. हा विजय इंग्लंडसाठी महत्त्वाचा ठरला कारण या स्पर्धेच्या इतिहासात पहिला सामना जिंकण्याची कामगिरी इंग्लंडने प्रथमच केली आहे. या विजयासह इंग्लंड ग्रुप डी मध्ये तीन गुणांसह पहिल्या स्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रिया संघाने नॉर्थ मेसेडोनियावर 3-1 च्या फरकाने विजय मिळवला. (England beat Croatia in UEFA Euro 2020 Austria also win over North Macedonia)

संपूर्ण सामन्यात एकमेव गोल

क्रोएशियाचा संघ मागील फिफा विश्वचषकातील उपविजेता संघ असल्याने सर्वांनाच त्यांच्याकडून बऱ्याच आशा आहेत. मात्र इंग्लंडसोबतच्या सामन्यात क्रोएशियाला सुरुवातीपासून काही खास खेळ दाखवता आला नाही. दुसरीकडे इंग्लंडने सामन्यात सुरुवातीपासून आपला दबदबा ठेवला होता. इंग्लंडने जॅक ग्रेलिशच्या जागी रहीम स्टर्लिंग (Raheem Sterling) याला संधी देण्यात आली. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खास कामगिरी न करताही स्टर्लिंगला संधी देण्यात आली. जिचे त्याने सोने करत संघासाठी एकमेव गोल करत सामना जिंकवून दिला. पहिल्या हाल्फमध्ये दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही.
त्यानंतर 57 व्या मिनिटाला फिलिप्सच्या पासवर स्टर्लिंगने गोल करत इंग्लंडला सामन्यात आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अखेरपर्यंत दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही ज्यामुळे इंग्लंडने 1-0 च्या फरकाने सामना जिंकला.

ऑस्ट्रियाचाही दमदार विजय

दुसरीकडे ऑस्ट्रिया आणि नॉर्थ मेसेडोनिया या संघात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रियाने 3-1 च्या फरकाने दमदार विजय मिळवला. नॉर्थ मेसेडोनिया पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्पर्धेत सहभागी झाला आहे. एकतर्फी झालेल्या सामन्यात 18 व्या मिनिटालाच ऑस्ट्रियाच्या शेफान लाइनरने गोल करत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर मेसेडोनियाकडून स्ट्राइकर गोरान पांडेवने जबरदस्त प्रतित्त्यूर देत 28 व्या मिनिटाला गोल केला. ज्यामुळे हाल्फ टाइम दरम्यान 1-1 असा स्कोर होतो. ज्यानंतर शेवटच्या काही मिनिटांत 78 व्या आणि 89 व्या मिनिटाला ऑस्ट्रियाच्या माइकल ग्रेगोरिच आणि मार्को अर्नाउतोविचने गोल करत संघाला 3-1 च्या फरकाने सामना जिंकवून दिला.

हे ही वाचा :

Euro 2020: फिनलँडचा ऐतिहासिक विजय, वेल्स आणि स्वित्झर्लंडमधील सामना अनिर्णीत, बेल्जियमची रशियावर मात

UEFA EURO 2020 | सामन्यादरम्यान डेन्मार्कचा दिग्गज फुटबॉलपटू मैदानातच कोसळला, बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल, सामना स्थगित

UEFA EURO 2020 | सामन्यादरम्यान डेन्मार्कचा दिग्गज फुटबॉलपटू मैदानातच कोसळला, बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल, सामना स्थगित

(England beat Croatia in UEFA Euro 2020 Austria also win over North Macedonia)