रोम : यूरो कप 2020 (Euro Cup 2020) स्पर्धेला अखेर सुरुवात झाली आहे. इटलीच्या रोम शहरातील स्टेडियो ओलिंपिको मैदानात या भव्य स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. इटली (Italy) विरुद्ध टर्की (Turky) या दोन देशांमध्ये पहिला सामना खेळवला गेला. पहिल्याच सामन्यात इटलीने अप्रतिम खेळ करत टर्कीवर 3-0 च्या फरकाने विजय मिळवला. इटलीचा स्टार स्ट्रायकर चिरो इमोबिले (Ciro Immobile) आणि लोरेंज़ो इनसीनिए (Lorenzo Insigne) यांन प्रत्येकी एक गोल केला. तर टर्कीच्या मेरिह डेमिरलने (Merih Demiral) चूकन स्वत:च्या संघाच्यात गोलपोस्टमध्ये बॉल घालवत ओन गोल केला. ज्यामुळे इटलीने 3-0 ने विजय मिळवला. (Euro 2020 Started Italy Scored 3 Goals Against Turky Won First Match)
?? Italy open with impressive display ?
28 games unbeaten (W23 D5), dating back to September 2018 ?
Not conceded more than 1 goal in any of their last 31 matches ?#EURO2020
— UEFA EURO 2020 (@EURO2020) June 11, 2021
विशेष म्हणजे इटलीचा संघ यूरो कपच्या मागील 9 ओपनिंग ग्रुप स्टेज सामन्यांत केवळ एकदाच पराभूत झाला आहे. त्यामुळे टर्कीविरुद्धच्या या विजयासह इटलीने रोममध्ये कोणताही मोठा सामना न हारण्याचा रेकॉर्ड कायम ठेवला. इटलीने वर्ल्ड कप आणि यूरो कप मिळून रोमच्या स्टेडियो ओलिंपिको मैदानात 9 सामने खेळले आहेत. ज्यातील 7 सामने जिंकले असून केवळ 2 सामने ड्रॅा झाले होते.
इटलीचा संघ सुरुवातीपासून टर्कीवर गोल करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र एकही प्रयत्न यशस्वी होत नसल्याने अर्धा सामना संपल्यानंतर मध्यांतरादरम्यानही स्कोर 0-0 होता. पहिल्या हाल्फमध्ये बॉल पजेशन इटलीकडे 68% तर टर्कीच्या संघाकडे 32% इतके होते. सामन्यात 53 व्या मिनिटाला पहिला गोल झाला. टर्कीच्यो गोलपोस्टजवळ इटलीच्या एका खेळाडूने गोल करण्यासाठी शॉट मारला जो टर्कीचा मेरिह डेमिरल याच्या शरीराला लागून गोलमध्ये शिरला. त्यानंतर 66 व्या मिनटाला इटलीच्या स्पिनाजोलाने पेनल्टी एरियापासून गोल करण्याचा प्रयत्न केला पण टर्कीचा गोलकीपर सकीर याने गोल जाण्यापासून रोखलं. ज्यानंतर चिरो इमोबिलेला बॉल मिळताच त्याने अप्रतिम गोल नोंदवत इटलीला 2-0 ची आघाडी मिळवून दिली. अखेर 79 व्या मिनीटाला इटलीच्या इनसीनिएने एक अप्रतिम शॉट घेत गोल केला. ज्यामुळे 3-0 च्या फरकाने सामना इटलीने जिंकला.
(Euro 2020 Started Italy Scored 3 Goals Against Turky Won First Match)