ब्राझीलिया : अमेरिकी देशांत सुरु असलेल्या कोपा अमेरिका चषक स्पर्धेत (Copa America Cup) लिओनल मेस्सी (Lionel Messi) कर्णधार असलेल्या अर्जेंटीना संघाने (Argentina) आपली अप्रतिम कामगिरी कायम ठेवत बोलिविया (Bolivia) संघावर 4-1 च्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. तिकडे युरो चषकात ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) पोर्तुगाल (Portugal) संघ स्पर्धेतून बाहेर गेल्याने रोनाल्डोचा खेळ पाहायला मिळणार नाही. मात्र कोपा अमेरिका स्पर्धेत मेस्सीची जादू कायम असून बोलविया विरुद्धही मेस्सीने दोन गोल दागल्याने अर्जेंटीनाने विजय मिळवला. (In Copa America Argentina vs Bolivia Match Messi did two goals And Argentina Won)
कायम म्हटले जाते की फुटबॉल हा एक सांघिक खेळ असून सर्व खेळाडूंच्या चांगल्या खेळानेच सामन्यात विजय मिळवता येतो. हे शत प्रतिशत खरे असले तरी एक उत्कृष्ठ खेळाडूही संघाचे भवितव्य बदलू शकतो हेही तितकेच खरे आहे. याची काही उदाहरण म्हणजे रोनाल्डो, मेस्सी, ल्युका मॉर्डीच. त्यात मॉर्डीचचा संघ क्रोएशिया आणि रोनाल्डोचा पोर्तुगाल युरो चषकातून बाहेर गेले असले तरी मेस्सीचा अर्जेंटीना अजूनही कोपो अमेरिका खेळत असल्याने अनेक फुटबॉल प्रेमींचे लक्ष अर्जेंटीनाच्या सामन्यांवर लागून आहे.
अर्जेंटीना आणि बोलिविया यांच्यात झालेल्या सामन्यात सुरुवातीपासूनच अर्जेंटीना संघाचे वर्चस्व होते. सामना सुरु होताच 5 व्या मिनिटाला मेस्सीच्या असिस्टवर गोम्स याने अप्रतिम गोल करत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर 34 व्या मिनिटाला अर्जेंटीनाला मिळालेल्या पेनल्टीवर मेस्सीने अप्रतिम गोल केला. त्यानंतर लगेचच 41 व्या मिनिटाला मेस्सीने पुन्हा आपला जलवा दाखवत उत्कृष्ट गोल करत सामन्यात 3-0 ची आघाडी घेतली. ज्यानंतर 59 व्या मिनिटाला बोलिवियाच्या सेवेड्रोने एक गल केला. मात्र 5 मिनिटांतच अर्जेंटीनाच्या मार्टीनेजने आणखी एक गोल करत संघाला 4-1 ने विजय मिळवून दिला.
#CopaAmérica ?@Argentina venció 4-1 a @laverde_fbf y estas fueron las acciones más destacadas del encuentro
?? Bolivia ? Argentina ??#VibraElContinente #VibraOContinente pic.twitter.com/fnFk8XTvTn
— Copa América (@CopaAmerica) June 29, 2021
या विजयापूर्वीच अर्जेंटीनाचा संघ क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचला होता. त्यामुळे बोलिविया विरुद्धचा विजयाने त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. आता अर्जेंटीनाची लढत क्वॉर्टर फायनलमध्ये इक्वाडोर संघाशी होणार आहे.
हे ही वाचा :
Euro 2020 : रोमहर्षक सामन्यात स्पेनचा विजय, क्रोएशियाला नमवत नवा रेकॉर्डही केला नावे
(In Copa America Argentina vs Bolivia Match Messi did two goals And Argentina Won)