ओसीजेक : भारताकडून क्रोएशियाच्या ओसीजेक येथे नेमबाजी विश्वचषक 2021 स्पर्धा खेळण्यासाठी गेलेल्या मराठमोळ्या नेमबाज राही सरनोबतने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 25 मीटर एअर पिस्तल प्रकारात राहीनं 39 गुणांसह अव्वल स्थान प्राप्त करत सुवर्णपदक खिशात घातलं आहे. तिने फ्रान्सच्या माथिल्डे लामोले (31) हिला मागे टाकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. (In ISSF Shooting World Cup Rahi Sarnobat Won Gold Medal For India)
क्रोएशिया येथील विश्वचषक स्पर्धेत २५ मी एअर पिस्टल प्रकारात कोल्हापूरच्या @SarnobatRahi ने भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले आहे. राहीच्या या सुवर्ण कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अभिनंदन राही.. pic.twitter.com/kufufgGDfc
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) June 28, 2021
राहीने आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत (ISSF Shooting World Cup) मिळवलेले हे सुवर्णपदक भारताला नेमबाजी विश्वचषकात मिळालेले पहिलेच सुवर्णपदक आहे. राहीसोबत खेळणाऱ्या भारताच्या मनु भाकेरला खास कामगिरी करता न आल्याने तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
राहीने स्पर्धेत सुरुवातापासून अप्रतिम कामगिरी करत 40 पैकी तब्बल 39 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. राही पाठोपाठ फ्रान्सच्या मॅथिलडे लामोलेला हिला 31 गुणांसह रौप्यपदक मिळाले. तर रशियाच्या विन्टालिना हिला 28 गुणांसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
या विश्वचषकात भारताला १० मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत सौरभ चौधरी आणि मनु भाकेर या भारतीय जोडीने रौप्यपदक मिळवून दिले होते. मात्र अद्यापर्यंत भारताला सुवर्णपद पटकावता आले नव्हते. अखेर राहीने 25 मीटर एअर पिस्तल प्रकारात अप्रतिम कामगिरी करत भारताला पहिले वहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
हे ही वाचा :
Archery World Cup: ‘गोल्डन हॅट्रिक’ नंतर दीपिका कुमारीची आणखी एक कमाल, जागतिक क्रमवारीतही अव्वल!
‘द वॉल’ने ठरवली श्रीलंका दौऱ्याची रणनीती, द्रविड म्हणतो तीनच T20 सामने, सगळ्यांनाच कशी संधी मिळेल?
(In ISSF Shooting World Cup Rahi Sarnobat Won Gold Medal For India)