म्युनिक : युरोपियन देशांत सर्वांत मानाची फुटबॉल स्पर्धा असणाऱ्या युरो चषक (Euro Cup 2020) स्पर्धेत आतापर्यंत सर्वच सामने चुरशीचे झाले असून आता स्पर्धा अंतिम टप्प्य़ात पोहोचली आहे. उपांत्य पूर्व फेरीचे दोन सामने झाले असून इटली (Italy) आणि स्पेन (Spain) हे दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. इटलीने शुक्रवारी झालेल्या सामन्यात बेल्जियमला (Belgium) 2-1 च्या फरकाने नमवत सेमीफायनल गाठली आहे. सुरुवातीपासून नावाला साजेशी खेळी करत इटलीच्या संघाने युरो चषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. (In Quarter Final of Euro 2020 Italy beat Belgium by 2-1 and Enters in Semi final)
संपूर्ण सामन्यात बेल्जियमचा स्टार खेळाडू रोमेलू लुकाकू (Romelu Lukaku) याने बरेच प्रयत्न केले पण इटलीचा डिफेन्स त्याला अधिकवेळा भेदता न आल्याने तो सामन्यात एकच गोल करु शकला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघ एकमेकांना जमके टक्कर देत होते. चुरशीच्या चाललेल्या सामन्याच्या 31 व्या मिनिटालाा इटलीच्या निकोलो बेरेला (Nicolo Barella) याने पहिला गोल करत इटलीला आघाडी मिळवून दिली. जी आघाडी 44 व्या मिनिटाला इटालीच्या लोरेंजोने (Lorenzo Insigne) गोल करत 2-0 अशी केली.
सामन्यात मध्यांतर होत असताना इटलीने 2-0 ची आघाडी घेतली होती. बेल्जियमवर दबाव असताना स्टार खेळाडू रोमेलोने संघाला मिळालेल्या पेनल्टीच्या जोरावर एक गोल करत संघाला दिलासा मिळवू दिला. सामन्यात स्कोर 2-1 झाला आणि बेल्जियमने सामन्यात पुन्हा एन्ट्री घेतली. पण त्यानंतर बेल्जियमला एकही गोल करता आला नाही. ज्यामुळे 2-1 च्या फरकाने अखेर इटलीचा संघ विजयी झाला.
?? Italy see off Belgium to book a semi-final date with Spain! ???#EURO2020
— UEFA EURO 2020 (@EURO2020) July 2, 2021
तिकडे स्वित्झर्लंड आणि स्पेन यांच्यात झालेल्या उपांत्य पू्र्व फेरीच्या सामन्यात दोन्ही संघानी संपूर्ण वेळ संपेपर्यंत एक-एकच गोल केला होता. त्यामुळे पेनल्टी शूटआऊट खेळवण्यात आला. ज्यामध्ये 3-1 च्या फरकाने स्पेनने विजय मिळवत सामना आपल्या नावे केला. या विजयामुळे स्पेनही सेमीफायनलमध्ये पोहोचली असून इटली आणि स्पेन यांच्यात 7 जुलैला भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटांनी सेमीफायनचा सामना रंगणार आहे.
हे ही वाचा :
Euro 2020 : रोमहर्षक सामन्यात स्पेनचा विजय, क्रोएशियाला नमवत नवा रेकॉर्डही केला नावे
(In Quarter Final of Euro 2020 Italy beat Belgium by 2-1 and Enters in Semi final)