Lionel Messi: लियोनल मेसीचं बायकोसोबत हॉट बर्थ डे सेलिब्रेशन, शेअर केले रोमँटिक फोटो
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेसी (lionel messi) पत्नी एंटोनेला रोकुजोसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. मेसी आपल्या कुटुंबासोबत पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
1 / 10
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेसी पत्नी एंटोनेला रोकुजोसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. मेसी आपल्या कुटुंबासोबत पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
2 / 10
पत्नी एंटोनेला रोकुजोच्या 34 व्या वाढदिवसासाठी मेसीने सुट्टयांचा हा प्लान केला आहे. 26 फेब्रुवारीला एंटोनेला 34 वर्षांची झाली. 1988 साली अर्जेंटिनाच्या रोसारियो शहरात तिचा जन्म झाला होता.
3 / 10
एंटोनेलाच्या बर्थडेच्या निमित्ताने लियोनल मेसीने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. मेसीने एक प्रेमाचा संदेशही पोस्ट केला आहे. त्यातून त्याने पत्नीबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे.
4 / 10
"माझ्या आयुष्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. हा दिवस तुझ्यासाठी खास आहे. आय लव्ह यू" मेसीच्या या रोमँटिक पोस्टला पत्नी एंटोनेलानेही रिप्लाय दिला आहे.
5 / 10
एंटोनेलाने रिप्लाय करताना आभार व्यक्त केले आहेत व आय लव्ह यू असे म्हटले आहे.
6 / 10
मेसीची एंटोनेला बरोबर लहानपणापासून मैत्री होती. वयाच्या पाचव्या वर्षापासून दोघे ऐकमेकांना ओळखतात.
7 / 10
अर्जेंटिनाच्या रोसारिया शहरात मेसी आणि एंटोनेलाचे बालपण गेले आहे.
8 / 10
2008 साली मेसी आणि एंटोनेलामध्ये प्रेमसंबंधांची सुरुवात झाली. नऊ वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी 2017 मध्ये लग्न केलं. या जोडप्याला तीन मुलं आहे. तिन्ही मुलगेच आहेत.
9 / 10
मेसी आणि एंटोनेलाने सर्वात जास्त वेळ स्पेनच्या बार्सिलोना शहरात घालवला आहे. मेसी त्यावेळी बार्सिलोना क्लबसाठी खेळायचा.
10 / 10
मागच्यावर्षी मेसीने बार्सिलोना क्लबला सोडचिठ्ठी देऊन पॅरिस सेंट जर्मेन क्लब जॉईंन केला. तेव्हापासून मेसीचे कुटुंब पॅरिसमध्ये स्थायिक झाले आहे.