हरयाणाच्या नीरजला कर्नाटकमध्ये मोफत बस प्रवास, नेटिझन्सकडून ट्रोल, म्हणाले…

| Updated on: Aug 11, 2021 | 11:36 AM

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळामध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिल्यानंतर नीरजवर संपूर्ण देशातून कौतुकासह बक्षिसांटा वर्षाव होत आहे.

हरयाणाच्या नीरजला कर्नाटकमध्ये मोफत बस प्रवास, नेटिझन्सकडून ट्रोल, म्हणाले...
नीरज चोप्रा
Follow us on

मुंबई : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) सुवर्णपदक मिळवलं आणि संपूर्ण देशांत आनंदोत्सव सुरु झाला. देशाला हा सर्वोच्च बहुमान मिळवून देणाऱ्या नीरजचा सन्मान करण्यासाठी देशातील अनेक नामांकित व्यक्ती आणि संस्थांनी नीरजला बक्षिस जाहीर केलं ज्यामध्ये विविध राज्यातील सरकारचा देखील वाटा आहे. कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (KSRTC) देखील नीरजचा सन्मान म्हणून त्याला कर्नाटकमध्ये आयुष्यभरासाठी मोफत बसप्रवासाची घोषणा करत एक विशेष गोल्डन पास दिला आहे. पण KSRTC च्या या निर्णायवर नेटकऱ्यांनी मात्र त्यांना धारेवर धरत, हरियाणाच्या नीरजचा कर्नाटकात मोफत प्रवासाची सुविधा देण्यापेक्षा गरजू स्थानिक खेळाडूंना ही सेवा द्यावी अशी मागणी केली आहे.

शनिवारी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक शिवयोगी कलासड यांनी KSRTC च्या ट्विटरवरुन ही माहिती दिली. ‘नीरजने ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन! त्याच्या या अप्रतिम कामगिरीला साजरं करताला आम्ही त्याला विषेश असा गोल्डन पास देत असून KSRTC च्या 60 व्या वर्ष्यात पदार्पणादरम्यान पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूचा असा सन्मान करण्यात आला आहे.’ 

नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी मात्र कमेंट्सची झुंबड उडवली. अनेकांनी नीरजला या पासचा काय उपयोग त्यापेक्षा तेथील गरजू खेळाडूंना द्यावा अशी मागणी केली. अनेकांनी मजेशीर ट्विट करत किमान नीरजला टॅग करा म्हणजे पास संपण्याआधी तो कलेक्ट करेल अशाही कमेंट केल्या. दरम्यान यावेळी KSRTC ने कोणतंही अधिकृत वक्तव्य दिलं नाही. पण एका अधिकाऱ्याने त्याच्या ट्विटरवरुन कमेंट करत नीरजला शुभेच्छा देण्याचा हा एक प्रयत्न असून आम्ही इतर गरजू खेळाडू, ऑलिम्पिकमधील खेळाडू अशा व्यक्तींना याआधीच मोफत पास दिले असल्याचे सांगितले.

इतर बातम्या

सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात

Video: जेव्हा टोकियोच्या मैदानावर तिरंगा फडकला, राष्ट्रगीतानं मैदान दुमदुमलं, पहा गोल्डन बॉय नीरजचा भावूक क्षण

(Netizens mocks and trolled KSRTC for offering neeraj chopra free bus pass at karnatak instead of local players)