सोफिया : नॉर्वेच्या (Norway) महिला हँडबॉल संघाला (Women’s Handball Team) युरो 2021 स्पर्धेदरम्यान बिकिनी बॉटम परिधान करुन खेळण्यास नकार दिल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. युरोपियन हँडबॉल फेडरेशनने (EHF) नॉर्वेच्या महिला हँडबॉल संघाला दंड ठोठावल्याची पुष्टी केली आहे. युरोपियन हँडबॉल असोसिएशनच्या शिस्त आयोगाच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘अयोग्य कपडे’ घातल्याबद्दल संघाला एकूण 1,500 युरो (1,700 डॉलर – 1,31,535 रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे. (Norway Handball Team fined 1500 euros for wearing shorts instead of bikinis)
रविवारी बल्गेरियात नॉर्वे विरुद्ध स्पेन या देशांच्या महिला हँडबॉल संघांमध्ये कांस्यपदकासाठी सामना खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान नॉर्वेच्या संघातील महिला खेळाडूंनी शॉर्ट्स घातल्या होत्या, हे कपडे बिकिनी डिझाइन नियमनाच्या विरोधात होते. बल्गेरियातील स्पेनविरुद्धच्या कांस्यपदकाच्या सामन्यादरम्यान नॉर्वेजियन खेळाडूंनी शॉर्ट्स घातले होते. तर फेडरेशनच्या नियमांनुसार या खेळाडूंनी बिकीनी बॉटम्स परिधान करने गरजेचे होते. नॉर्वेजियन हँडबॉल फेडरेशनने (एनएचएफ) आम्ही आमच्या खेळाडूंसाठी दंड भरणार असल्याची घोषणा केली असता संघटनेच्या इन्स्टाग्राम पेजवरील पोस्टद्वारे फेडरेशनने त्यांचे समर्थन केले आहे.
नॉर्वेजियन हँडबॉल फेडरेशनचे अध्यक्ष कोरे गीर लिओ यांनी निवेदनात म्हटले आहे की, सामन्याच्या 10 मिनिटांपूर्वी मला असा मेसेज मिळाला की संघाचे खेळाडू ज्या कपड्यांमुळे कम्फर्टेबल आहेत, ते तेच कपडे घालतील आणि त्यांना आम्ही पूर्ण पाठिंबा दिला. आम्ही विचार केला की, चला आता हे करूया आणि मग काय होते ते पाहूया. आंतरराष्ट्रीय हँडबॉल फेडरेशनच्या नियमांनुसार, महिला बीच हँडबॉलमध्ये खेळाडूंना मिड्रिफ-बारिंग टॉप आणि बिकिनी बॉटम्स परिधान करणे आवश्यक आहे, तर पुरुष खेळाडूंना टँक टॉप आणि शॉर्ट्स (गुडघ्यापेक्षा 4 इंच वरपर्यंत, त्यापेक्षा मोठ्या चालणार नाहीत) परिधान करणे गरजेचे आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर चाहते संतापले आहेत. अनेक हँडबॉलप्रेमी तसेच नॉर्वे संघाच्या पाठिराख्यांनी सोशल मीडियावरुन या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. अनेकांनी ट्विटरवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
इतर बातम्या
IND vs SL : ‘या’ कारणामुळे राहुल द्रविडने दीपकला लवकर फलंदाजीसाठी पाठवलं, भुवनेश्वरने केला खुलासा
(Norway Handball Team fined 1500 euros for wearing shorts instead of bikinis)