लंडन : विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेची काही दिवसांपूर्वी (Wimbledon 2021) इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हीचने (Novak Djokovic) दक्षिण आफ्रिकेच्या एंडरसनला दुसऱ्या फेरीत पराभूत करत आपली यशस्वी कारकिर्द कायम ठेवली आहे. 19 ग्रँड स्लॅम मिळवलेला नोव्हाक सध्या 20 वे ग्रँड स्लॅम पटकावण्यासाठी विम्बल्डन स्पर्धेत घाम गाळतो आहे. खेळताना अत्यंत फोकसने खेळणारा नोव्हाक मैदानाबाहेर तितकाच दिलखुलास आहे. नोव्हाकने असाच दिलखुलासपणा दाखवत स्वत:चा एक फोटो ट्विट केला आहे आणि नेटकऱ्यांना मीम्स बनवण्याचे आमंत्रण ही दिले आहे.
नोव्हाकने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तो एक टेनिसचा सामना खेळताना दिसून येत आहे. ज्यात सामन्यादरम्यान एक अवघड शॉट खेळण्यासाठी स्वत:ला संपूर्णपणे ताणले आहे आणि तोच फोटो नोव्हाकने पोस्ट केला आहे. सोबतच फोटोला ‘स्पायडरन मॅन रिटर्न्स’ असे कॅप्शन देत चाहत्यांना मीम्स बनवा असेही लिहिले आहे. ज्यामुळे त्याने चाहत्यांना मजेशीर मीम्स बनवण्याचं जणू आमंत्रणच दिलं आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी देखील मीम्सचा पाऊस पाडला आहे. तर सर्वात आधी पाहूया नोव्हाकने नेमकं काय ट्विट केलं आहे.
Spider-Man returns hahahaa ??? let the memes begin #WimbledonThing pic.twitter.com/OkNQeirPJD
— Novak Djokovic (@DjokerNole) June 30, 2021
नोव्हाक जोकोव्हीचने स्वत:च मीम्स बनवण्याची मुभा दिल्यानंतर नेटकऱ्यांनी संधीचा संपूर्ण फायदा उचलत अनेक फोटोंद्वारे नोव्हाकच्या फोटो आणि कॅप्शनला धरुन बरेच मीम्स बनवले आहेत. यातील काही खास आणि हटके मीम्स पाहुयात…
— Satoru Gojo (@Alex_Abt) June 30, 2021
?? #Novak #Spiderman #Novaksplit #Wimblendonthing pic.twitter.com/OKzYzVUnPo
— Divapati Prem (@DivapatiPrem) June 30, 2021
— Mahesh S Wali (@MaheshS_Wali) June 30, 2021
नोव्हाक जोकोव्हीचने (Novak Djokovic) विम्बल्डनमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात 15 व्यांदा तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. जोकोव्हीचने दक्षिण अफ्रिकेच्या के. एंडरसनला (K. Anderson) 6-3, 6-3, 6-3 अशा सरळ सेट्समते मात देत पुढची फेरी गाठली. विम्बल्डनच्या मैदानावर खेळाडूंना मोठ्या प्रमाणात घसरायला होत असतानाही नोव्हाकने संयमी खेळी करत विजय मिळवला. नोव्हाकने नुकतीच ऑस्ट्रेलियन ओपनसह फ्रेंच ओपन स्पर्धाही जिंकली. त्यामुळे आता विम्बल्डन स्पर्धाही जिंकण्यासाठी तो कडी मेहनत घेत आहे.
हे ही वाचा –
Wimbledon 2021 : सलामीच्या सामन्यात जोकोव्हीच विजयी, तर त्सित्सिपासचा पराभव
Photo : टोक्यो ऑलिम्पिक 2021 मधून ‘या’ दिग्गज टेनिसपटूंची माघार, प्रत्येकाची कारण वेगवेगळी
(Novak Djokovic Shares his Photo Playing in Wimbledon 2021 And Gave caption as Spider Man After this post Memes On Novak spiderman Went Viral on Social Media)