नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा करण्यात आली आहे. एकूण सहा क्रीडापटूंना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रालाही (Neeraj Chopra) पद्म श्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेतील देवेंद्र झाझरीयाला (Devendra Jhajharia) पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
भारतीय महिला हॉकी संघातील स्टार खेळाडू वंदना कटारिया, टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेतील अवनी लेखारा, सुमीत अंतिल, आणि प्रमोद भगत यांना पद्म श्री पुरस्कार जाहीर झाला आहे. भारताच्या फुटबॉल संघाचे माजी कर्णधार ब्रम्हानंद यांना सुद्धा पद्म श्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 67 वर्षाच्या ब्रम्हानंद यांनी गोलकिपर म्हणून 1983 ते 1986 दरम्यान भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्व केले होते. यंदाच्यावर्षी राष्ट्रपतींनी 128 पद्म पुरस्कारांना मंजुरी दिली.
चौघांना पद्म विभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 107 पद्म श्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये 34 महिला आहेत. नीरज चोप्रा, अवनी लेकहारा, सुमीत अंतिल आणि प्रमोद भगत यांना 2021 मध्य खेल रत्न पुरस्कार प्राप्त झाला होता. अथलॅटिक्समध्ये भालापेकीच्या प्रकारात नीरज चोप्राने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. हरयाणाच्या नीरजने 87.58 मीटर अंतरापर्यंत भालाफेक करुन भारताच्या खात्यात सुवर्णपदक जमा केले.
पद्म पुरस्कार विजेत्या क्रिडापटुंची यादी
देवेंद्र झाझरीया – पॅरालिम्पिक – पद्म भूषण
सुमीत अंतिल – पद्म श्री
प्रमोद भगत – पद्म श्री
नीरज चोप्रा – भालाफेक – पद्म श्री
वंदना कटारिया – हॉकी – पद्म श्री
अवनी लेखहारा – पद्म श्री
ब्रम्हानंद – फुटबॉल – पद्म श्री