Live Score Gujarat Giants vs Dabang Delhi : प्रो-कबड्डी लीगमध्ये रविवारी दिवसातील पहिलाच सामना अटीटतीचा झाला. पहिल्या सामन्यात दबंग दिल्ली आणि गुजरात जायंट हे दोन संघ भिडले. उभय सघांमधील हा रोमहर्षक सामना बरोबरीत संपला, दबंग दिल्ली आणि गुजरात जायंट्समधील हा सामना 24-24 असा बरोबरीत सुटला.
दिल्लीकडून या सामन्यात नवीन कुमारने सर्वाधिक 11 पॉईंट्स मिळवले. त्याने 8 रेड पॉईंट्स आणि 3 बोनस पॉईंट्सची कमाई केली. तर विजय मलिकने 5 पॉईंट्स (4 रेड, 1 बोनस) मिळवत त्याला चांगली साथ दिली. संदीप नरवालने 2 टॅकल पॉईंट्स मिळवले. अजय ठाकूर आणि क्रिशनने प्रत्येकी 1-1 टॅकल पॉईंट मिळवला.
दुसऱ्या बाजूला गुजरात जायंट्सकडून राकेश नरवालने 9 पॉईंट्स मिळवले. त्यात 7 रेड पॉईँट्स आणि 2 बोनस पॉईंट्सचा समावेश होता. राकेश सुंग्रोयाने 5 गुण (4 रेड, 1 बोनस) मिळवले. महेंद्र गणेश राजपुतने 2 रेड पॉईंट्सची कमाई केली. तर सुनील कुमारने या सामन्यात 4 टॅकल पॉईंट्स मिळवले. रवींद्र पहलने 1 टॅकल पॉईंट मिळवला.
Live Score Gujarat Giants vs Dabang Delhi K.C : रोमहर्षक सामना बरोबरीत संपला, दबंग दिल्ली आणि गुजरात जायंट्स हा सामना 24-24 असा बरोबरीत सुटला
Live Score Gujarat Giants vs Dabang Delhi K.C.: दुसरा हाफ संपायला 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ बाकी, सामना रोमांचक स्थितीत, दिल्ली 1 गुणाने आघाडीवर, स्कोअर- दिल्ली 22-21 गुजरात
सुरुवातीच्या 30 मिनिटांचा खेळ संपला आहे. आतापर्यंतचा सामना अटीतटीचा झाला आहे. दोन्ही संघ 14-14 गुणांवर आहेत.
प्रो-कबड्डी लीगमध्ये रविवारी दिवसाच्या पहिल्या सामन्यात दबंग दिल्ली आणि गुजरात जायंट हे दोन संघ भिडणार आहेत. तर हा सामना झाल्यानंतर बेंगलुरु बुल्स विरुद्ध बेंगाल वॉरियर्स असा अजून एक सामना रंगणार आहे.
Giants ki goonj ?️ ? Dabang-giri ?
Hi-Flyer ✈️ ? Super-Mani ??♂️Sunday ko aao haan, Sunday ko mast ready hokar aao coz it’s going to be a blockbuster night of #Superhitpanga! ?#vivoProKabaddi #GGvDEL #BLRvBEN@GujaratGiants @DabangDelhiKC @BengaluruBulls @BengalWarriors pic.twitter.com/J4NdJSMUT0
— ProKabaddi (@ProKabaddi) December 26, 2021