बेंगळुरु: आज झालेल्या दिवसातील तिसऱ्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. हरयाणा स्टीलर्सवर त्यांनी अवघ्या दोन गुणांच्या फरकाने विजय मिळवला. रंगतदार झालेल्या या सामन्यात पिंक पँथर्सने 40-38 अशी मात केली. प्रामुख्याने रेड म्हणजे चढाईचा खेळ या सामन्यात पाहायला मिळाला. पिंक पँथर्स आणि स्टीलर्सने रेडमध्ये प्रत्येकी 27-27 पॉईंट मिळवले. टँकलमध्येही दोन्ही संघ 9-9 असे बरोबरीत होते. पँथर्सकडून अर्जून देसवालने चमकदार खेळ केला. त्याने 18 पॉईंटसची कमाई केली. पँथर्सचा पहिल्या सामन्यात गुजरात जायंटसकडून पराभव झाला होता.
पुण्याने एका पॉईंटने मिळवला विजय
शेवटच्या सेकंदापर्यंत थरारक ठरलेल्या सामन्यात पुणेरी पलटनने बाहुबली तेलगु टायटन्सवर एका गुणाच्या फरकाने 34-33 असा विजय मिळवला. तेलगु टायटन्सकडून सिद्धार्थ देसाईने एकाकी झुंज दिली. त्याने रेडमध्ये 15 असे एकूण 18 पॉईंटस मिळवले.
अंकित बेनिवालच्या एका रेडचा अपवाद वगळता तेलगु टायटन्सकडून सिद्धार्थ देसाईनेच रेडसमध्ये पॉईंटस मिळवून दिले. पुणेरी पलटनने टॅकल म्हणजे पकडीत तेलगु टायटन्सपेक्षा सरस कामगिरी केली. पुणेरी पलटनने रेडमध्ये 13 तर टायटन्सनी आठ पॉईंटस मिळवले. त्याशिवाय पुण्याकडून मोहित गोएत यशस्वी रेडर ठरला. त्याने सात पॉईंटस मिळवले.
प्रदीप नरवाली यूपी जिंकली
शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक ठरलेल्या सामन्यात प्रदीप नरवालच्या (Pradeep narwal) यूपी योद्धाने पटना पायरेटसवर (Patna pirates) अवघ्या एका गुणाच्या फरकाने विजय मिळवला. 36-35 असा यूपीने हा सामना जिंकला. यूपी योद्धाच्या रेडरची पटना पायरेटसने पकड केली पण बोनस पॉईंट घेऊन त्यांनी विजय मिळवला. प्रदीप नरवालने नऊ यशस्वी रेड करत 12 पॉईंटस मिळवले. पण पटना पायरेटसने आठ वेळा प्रदीप नरवालला टॅकल केले. म्हणजे पकड केली.
पटनाच्या मोनू गोयतकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण त्याने फक्त पाच पॉईंटस मिळवले. आजच्या सामन्यात रेड इतक्याच पकडी महत्त्वाच्या ठरल्या. पटनाने रेडमध्ये 17 आणि टॅकलमध्ये 17 गुण मिळवले तर यूपी योद्धाने रेडमध्ये 20 आणि टॅकलमध्ये 13 पॉईंटस मिळवले. दुसऱ्या हाफमध्ये यूपीने टॅकलमध्ये सुधारणा केली.
हरयाणा स्टीलर्सवर त्यांनी अवघ्या दोन गुणांच्या फरकाने विजय मिळवला. रंगतदार झालेल्या या सामन्यात पिंक पँथर्सने 40-38 अशी मात केली.
जयपूर पिंक पँथर्स आणि हरयाणा स्टीलर्समध्ये तिसरा सामना होणार आहे. जयपूरला गुजरातने सलामीच्या सामन्यात 34-27 असे पराभूत केले होते. हरयाणा स्टीलर्सला अटी-तटीच्या सामन्यात पटनाने 42-39 असे पराभूत केले होते.
यूपी योद्धा विरुद्ध पटना पायरेटस सामन्याप्रमाणे या लढतीतही पुणेरी पलटनने तेलगु टायटन्सवर एका पॉईंटच्या फरकाने विजय मिळवला.
पुणेरी पलटन आणि तेलगु टायटन्समध्ये अटीतटीचा सामना. दोन्ही संघ 30-30 बरोबरीत
पुण्याने जोरदार कमबॅक केलं असून ते 25-21 ने पुढे आहेत.
शेवटच्या तीन चार मिनिटात तेलगु टायटन्सने आपला खेळ उंचावला व पुणेरी पलटनवर सहा पॉईंटसचा लीड घेतला. तेलगु टायटन्स 20-14 ने पुढे आहे.
पुणेरी पलटनने सिद्धार्थ देसाईला सुपर टॅकल करत दोन पॉईंटस मिळवलेत. पुणे 11-9 ने पुढे आहे.
पुणेरी पलटन आणि तेलगु टायटन्समध्ये रोमांचक सामना सुरु आहे. दोन्ही टीम्स एक-एक पॉईंटसाठी संघर्ष करत आहेत.
पुणेरी पलटन आणि तेलगु टायटन्समध्ये दुसरा सामना होत आहे. पहिला विजय मिळवण्याचा पुण्याचा प्रयत्न असेल. त्यांच्यासमोर बाहुबली सिद्धार्थ देसाईचे आव्हान आहे. सिद्धार्थ टायटन्सचा मुख्य रेडर आहे.
रोमांचक सामन्यात एका पॉईटने यूपी योद्धाने पटना पायरेटसवर 36-35 असा विजय मिळवला. यूपी योद्धाच्या रेडरची पटना पायरेटसने पकड केली पण बोनस पॉईंट घेऊन त्यांनी विजय मिळवला.
यूपी योद्धा पटना पायरेटसपेक्षा चार पॉईटसनी पुढे आहे. यूपीकडे 32-28 अशी आघाडी आहे.
पटना पायरेटस ऑलआऊट. यूपी योद्धा 29-26 ने पुढे.
यूपी योद्धाने पिछाडी भरुन काढत पटना पायरेटस बरोबर 24-24 बरोबरी केली आहे.
पहिल्या हाफचा खेळ संपला असून पटना पायरेटसने यूपी योद्धावर तीन गुणांची आघाडी घेतली आहे. पटना पायरेटस 20-17 ने पुढे आहेत.
पटना पायरेटसने सलग दोन सुपर टॅकल करत चार पॉईंटस मिळवले. ते आता यूपीपेक्षा एका पॉईंटने पुढे आहेत.
श्रीकांत जाधवची सुपर रेड. पटना पायरेटसच्या तिघांना केलं बाद. यूपी योद्धाकडे चार पॉईंटसची आघाडी.
प्रदीप नरवालने दमदार सुरुवात केली आहे. रेडमध्ये चार पॉईंट मिळवत सहा गुण मिळवले आहेत.
यूपी योद्धा विरुद्ध पटना पायरेटस सामन्याला सुरुवात झाली आहे. यूपी योद्धा 3-1 ने पुढे आहे.
मागच्या सामन्यात प्रदीप नरवालने यूपी योद्धासाठी जबरदस्त कामगिरी केली होती. पण सहकारी खेळाडूंकडून अपेक्षित साथ न मिळाल्यामुळे यूपीचा बेंगाल वॉरिअर्सने 38-33 असा पराभव केला होता.
प्रो कबड्डी लीगमध्ये आज यूपी योद्धाचा सामना तीन वेळच्या विजेत्या पटना पायरेटस बरोबर होणार आहे. पटनाला विजेते बनवण्यात महत्त्वाची भूमिका असलेला प्रदीप नरवाल आता यूपीकडून खेळत आहे.