बेंगळुरु: प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro kabbadi league) आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने यूपी योद्धावर तीन गुणांच्या फरकाने 32-29 असा विजय मिळवला. अर्जून देशवाल आणि दीपक हुड्डाच्या बळावर जयपूरने विजय मिळवला. अर्जूनने 11 तर दीपकने सात पॉईंटस मिळवले. जयपूरने यूपी योद्धाच्या तुलनेत पकडीमध्ये चांगला खेळ केला. त्यांनी टॅकलमध्ये आठ तर योद्धाने चार पॉईंट मिळवले. रेडमध्ये योद्धाने 23 तर पँथर्सने 20 गुण मिळवले.
प्रो कबड्डी लीगमधला स्टार प्लेयर प्रदीप नरवाल आज पुन्हा एकदा फेल गेला. त्याने रेडमध्ये फक्त तीन पॉईंट मिळवले. त्यातुलनेत सुरींदर गिल आणि रोहित तोमरने चांगली कामगिरी केली. यूपीला पुढच्या सामन्यात विजय मिळवायचा असेल, तर प्रदीप नरवालला आपली कामगिरी उंचावावी लागेल. जयपूर पिंक पँथर्स हा अभिषेक बच्चनचा संघ आहे.
यू मुंबा-तेलगु टायटन्स सामना टाय
प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi League) आजच्या पहिल्या सामन्यात कुठलाही निकाल लागला नाही. दोन्ही संघाचे 30-30 पॉईंटस झाल्यामुळे यू मुंबा आणि तमिळ थलायवाजचा सामना टाय झाला. यू मुंबाकडून (U mumba) अजित कुमारने (Ajith kumar) जबरदस्त खेळ केला. शेवटपर्यंत त्याने मुंबाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण शेवटच्या रेडमध्ये तमिळ थलायवाजने त्याची पकड केली. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.
अजित कुमारने एकट्याने रेडमध्ये 14 पॉईंट मिळवले. पहिल्या सामन्यात चमक दाखवणारा अभिषेक सिंह आजच्या सामन्याहीत निष्प्रभ ठरला.
प्रो कबड्डी लीगमधला स्टार प्लेयर प्रदीप नरवाल आज पुन्हा एकदा फेल गेला. त्याने रेडमध्ये फक्त तीन पॉईंट मिळवले. त्यातुलनेत सुरींदर गिल आणि रोहित तोमरने चांगली कामगिरी केली.
जयपूर पिंक पँथर्सने तीन पॉईंटसच्या फरकाने विजय मिळवला आहे. 32-29 असा जयपूरने यूपी योद्धावर विजय मिळवला.
सामना संपायला काही मिनिट बाकी असून जयपूर पिंक पँथर्स आणि यूपी योद्धामध्ये फक्त दोन पॉईंटच अंतर, 30-28 ने पँथर्स पुढे
पहिल्या हाफमध्ये जयपूर पिंक पँथर्स 19-12 ने आघाडीवर आहे. सुरींदर गिलच्या रेडमुळे यूपी योद्धाला हे अंतर कमी करता आले. स्टार प्लेयर प्रदीप नरवाल निष्प्रभ ठरला आहे.
पिंक पँथर्सचा अर्जून देशवाल जबरदस्त खेळत असून जयपूरचा संघ 12-7 ने आघाडीवर आहे.
यूपी योद्धा विरुद्ध पिंक पँथर्स दिवसातील दुसरा सामना सुरु झाला आहे. पँथर्सकडे निसटती एका पॉईंटची आघाडी आहे.
प्रो कबड्डी लीगमधील दिवसातील आजचा पहिला सामना टाय ठरला. यू मुंबा आणि तमिळ थलायवाजमध्ये 30-30 पॉईंटवर सामना टाय झाला.
यू मुंबाकडून अजित कुमार दमदार खेळ करत आहे. सुपर टेन पार करत त्याने 13 पॉईंट मिळवलेत. रेडमध्ये 12 गुण वसूल केले.
तमिळ थलायवजा तीन गुणांनी पुढे आहे. 23-20 ने आघाडीवर आहेत.
दुसऱ्या हाफला सुरुवात झाल्यानंतर तमिळ थलायवाजाने पुन्हा कामगिरी उंचावत 21-15 अशी आघाडी घेतली आहे.
पहिला हाफ संपला असून तमिळ थलायवाज 17-14 ने पुढे आहेत. एकवेळ यू मुंबा आणि थलायवाजच्या पॉईंटमध्ये 10 ते 12 पॉईंटचे अंतर होते. पण पहिला हाफ संपायला काही मिनिट बाकी असताना मुंबईने कामगिरी उंचावत गुणांमधील अंतर कमी केले.
तमिळ थलायवाजने मुंबईवर मोठी आघाडी घेतली आहे. 12-2 ने थलायवाज पुढे आहेत. रेडमध्ये थलायवाजने चार आणि टॅकलमध्ये पाच पॉईंट मिळवले. मुंबईला ऑलआऊट करुन दोन पॉईंटस घेतले.
यू मुंबा आणि तमिळ थलायवाजमध्ये सामना सुरु झाला असून थलायवाज 4-1 ने पुढे आहे.
पहिल्या सामन्यात यू मुंबाचा रेडर अभिषेक सिंहने दमदार कामगिरी केली होती. आज अभिषेक रेड मध्ये कशी कामगिरी करतो त्यावर बरेच काही अवलंबून असेल.
नवीन कुमारच्या शानदार खेळाच्या बळावर दबंग दिल्लीने यू मुंबावर मात केली होती. दिल्लीचा स्पर्धेतील सलग दुसरा विजय तर मुंबईचा पहिला पराभव ठरला होता.