Rishabh Pant Accident : अपघात कसा झाला? शुद्धीवर येताच ऋषभ पंत म्हणाला, डोळा लागला अन्…

| Updated on: Dec 30, 2022 | 12:55 PM

ऋषभच्या डोक्याला मार लागला आहे. त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे. त्याला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे.

Rishabh Pant Accident : अपघात कसा झाला? शुद्धीवर येताच ऋषभ पंत म्हणाला, डोळा लागला अन्...
Rishabh Pant Accident : अपघात कसा झाला? शुद्धीवर येताच ऋषभ पंत म्हणाला, डोळा लागला अन्...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

डेहराडून: क्रिकेटपटू ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर त्याच्या कारला जोरदार अपघात झाला आहे. या अपघातात कार जळून खाक झाली आहे. आज पहाटे रुडकीच्या गुरुकुल नारसन परिसरात हा अपघात झाला. स्थानिक लोकांनी तात्काळ 108 नंबर डायल केला. त्यानंतर रुग्णवाहिका आल्यावर ऋषभ पंतला रुग्णालयात दाखल केलं. आता ऋषभला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

ऋषभ पंत याच्या कारला झालेला अपघात अत्यंत भीषण होता. तो इतका भीषण होता की कार डिव्हाडरला धडकली. त्यानंतर खांबाला धडक दिली आणि पलटी झाली. त्यानंतर कारने अचानक पेट घेतला आणि बघता बघता नव्या कोऱ्या कारचा कोळसा झाला.

या दुर्घटनेत ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला मुक्का मार लागला आहे. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे.

शुद्धीवर येताच…

या दुर्घटनेनंतर ऋषभ पंत शुद्धीवर आला आहे. त्याने अपघात कसा झाला आणि या अपघातातून आपण कसे बचावलो याची माहिती त्याने दिली आहे. जर पंत कारमधून बाहेर पडला नसता आणि थोडाही उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना झाली असती. कारण कार पलटल्यानंतर कारने लगेच पेट घेतला होता.

 

विंडो स्क्रिन तोडली म्हणून…

ऋषभ स्वत: कार चालवत होता. कार चालवत असताना त्याचा डोळा लागला अन् कार डिव्हायडरला जाऊन धडकली. त्यानंतर ही कार खांबाला धडकली. अपघात झाल्यावर मी तात्काळ कारची विंडो स्क्रिन तोडून बाहेर पडलो, त्यामुळेच बचावलो, असं त्याने सांगितलं.

डोक्याला मार

दरम्यान, ऋषभच्या डोक्याला मार लागला आहे. त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे. त्याला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे. तिथे तपासण्या केल्यानंतर योग्य उपचार केले जाणार आहेत.