पॅरिस : जागतिक फुटबॉलमधील एक प्रमुख डिफेन्डर आणि रिअल माद्रिद संघाचा (Real Madrid) एक यशस्वी कर्णधार अशी ओळख असणाऱ्या सर्जियो रामोसने (Sergio Ramos) काही दिवसांपूर्वी रिअल माद्रिदसोबत करार संपल्यानंतर क्लब सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून सर्जिओ कोणता संघ जॉईन करणार याकडे संपूर्ण फुटबॉल जगताचे लक्ष लागून होते. तब्बल 16 वर्ष रिअल माद्रिद संघासोबत असणाऱ्या सर्जियोने संघाला 22 महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवून दिला. ज्यामध्ये 4 चॅम्पियन्स लीग, 5 ला लीगाच्या चषकांचाही समावेश होता. तो स्पेनच्या विश्वचषक विजेच्या संघातही होता. त्यामुळे त्याच्यासारखा दिग्गज आता कोणत्या नव्या संघात सामिल होतो याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर सर्जिओ नव्या संघात सामिल झाला आहे. (Sergio Ramos Joins PSG Club After Leaving Real Madrid and signs contract til 30 june 2023)
पॅरिस फुटबॉल लीगमधील पॅरिस सेंट जर्मन (Paris Saint-Germain F.C.) या प्रसिद्ध फुटबॉल संघात सर्जिओ दाखल झाला असून पीएसजी संघाने याबाबतची माहिती त्यांच्या ट्विवटरवरुन दिली आहे. पीएसझीने सर्जिओसाठी बऱ्याच वेलकम पोस्ट शेअर करत त्याच्या येण्याचा आनंद व्यक्त केला आहे. सर्जिओने 30 जून, 2023 पर्यंत पीएसजीसोबत करार साईन केला आहे. त्यामुळे त्याला वेलकम जर्सीवर 2023 असा नंबर देण्यात आला आहे. याशिवाय सहसा सर्जिओ 4 नंबरचीच जर्सी घालतो. त्यामुळे सामन्यांदरम्यान तो 4 नंबरची जर्सी घालण्याची शक्यता आहे.
✍️? #?????????????
Le @PSG_inside est heureux d’annoncer l’arrivée dans son effectif de @SergioRamos. Le défenseur central espagnol a signé un contrat de deux ans et est lié au club jusqu’au 30 juin 2023.
❤️? #WeAreParis
— Paris Saint-Germain (@PSG_inside) July 8, 2021
सर्जियो मागील बरीच वर्ष रिअल माद्रिद संघाकडून खेळत होता. त्यांचा करार विशिष्ट काळानंतर रिन्यूव होत असतो. मात्र यंदाच्या करारावर सर्जियो आणि संघ व्यवस्थापनात सहमती झाली नसल्याचं स्पॅनिश मीडियाकडून सांगण्यात आलं. याच कारणामुळे सर्जियोने करार संपवत संघ सोडण्याचा निर्णय घेतला. सर्जियोचा करार जूनमध्ये संपत होता. संघ पुढील एक वर्षाचा करार करण्याच्या तयारीत होता. पण सर्जियोला दोन वर्षांचा करार करण्याची इच्छा असल्यानं त्यांची सहमती झाली नाही आणि सर्जियोने संघ सोडण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा :
Euro 2020 : रोनाल्डो ठरला Successful, एकाच सामन्यात चार दमदार विक्रम नावावर
Euro 2020 : इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंड अंतिम सामन्यात, युरो चषकाची फायनल इटली विरुद्ध इंग्लंड
Euro 2020 : 13 वर्षांपूर्वीचा बदला घेत इटलीची स्पेनवर मात, अंतिम सामन्यात इटली दिमाखात दाखल
(Sergio Ramos Joins PSG Club After Leaving Real Madrid and signs contract til 30 june 2023)