Padma Award 2024 for Sports | क्रीडा विश्वातून ‘या’ 7 दिग्गजांना मिळाला 2024 पद्मश्री सन्मान

| Updated on: Jan 26, 2024 | 9:40 AM

Padma Award 2024 for Sports | वर्ष 2024 साठी पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. या लिस्टमध्ये सात खेळाडू आहेत. जाणून घ्या भारतीय क्रीडा विश्वातून कुठल्या 7 खेळाडूंना हा पुरस्कार जाहीर झालाय.

Padma Award 2024 for Sports | क्रीडा विश्वातून या 7 दिग्गजांना मिळाला 2024 पद्मश्री सन्मान
padma award 2024
Follow us on

Padma Shri 2024 For Sports | भारतीय टेनिस जगतातील दिग्गज खेळाडू रोहन बोपन्ना आणि स्क्वॅश खेळाडू जोशना चिनप्पा यांची वर्ष 2024 च्या पद्म पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात येईल. पद्मश्री भारताचा चौथा सर्वोच्च नागरिक सम्मान आहे. या लिस्टमध्ये मल्लखांभचे कोच उदय विश्वनाथ देशपांडे, भारतीय पॅरा-बॅडमिंटन टीमचे मुख्य कोच गौरव खन्ना, तीरंदाज पुरिमा महतो, पॅरा स्वीमर सतेंद्र सिंह लोहिया आणि माजी हॉकी खेळाडू हरबिंदर सिंह यांचा समावेश आहे.

रोहन बोपन्नाने अलीकडेच इतिहास रचला. कारण पुरुष दुहेरीच्या रँकिंगमध्ये टॉपवर पोहोचणारा टेनिस इतिहासातील तो सर्वात वयोवृद्ध खेळाडू आहे. बोपन्न सतत चांगलं प्रदर्शन करतोय. सोमवारी नवीन रँकिंग जाहीर झाली. तो नंबर 1 वर असणारा सर्वात वयोवृद्ध खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 च्या फायनलमध्येही तो पोहोचला आहे.

ग्रँड स्लॅम ट्रॉफी जिंकणारा चौथा भारतीय

शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष दुहेरीत पहिला किताब जिंकण्यासाठी रोहन बोपन्ना मैदानात उतरेल. मॅथ्यू एब्डेन त्याचा पार्ट्नर असेल. 43 वर्षाचा बोपन्ना ग्रँड स्लॅम ट्रॉफी जिंकणारा चौथा भारतीय आहे. त्याने 2017 मध्ये फ्रेंच ओपनमध्ये कॅनेडियन जोडीदार गॅब्रिएला डाब्रोवस्कीसह मिश्र दुहेरीचा किताब जिंकला होता. पुरुष दुहेरीत वर्ष 2022 मध्ये फ्रेंच ओपनमध्ये त्याने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं होतं. त्यावेळी त्याने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. विम्बलडन 2013, 2015, 2023 च्या सेमाफायनलपर्यंत बोपन्नाने धडक मारली होती.

कोण आहे जोशना च‍िनप्पा? 

जोशना चिनप्पा स्क्वॅश खेळाडू आहे. तिने एशियन गेम्समध्ये अनेक पदक जिंकली होती. राष्ट्रकुल स्पर्धेत दोनवेळा पदकविजेती कामगिरी केलीय. डबल्सच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चार मेडल जिंकली आहेत. यात 2022 च एक गोल्ड मेडलही आहे.

मल्लखांभसाठी उदय देशपांडे यांचा सम्मान 

अन्य खेळांमध्ये हॉकी खेळाडू हरबिंदर सिंह आणि स्वदेशी मल्लखांबसाठी कार्य करणारे उदय देशपांडे यांना सुद्धा पद्म पुरस्कार जाहीर झालाय. तीरंदाज पुरिमा महतो यांनी 1998 कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी केली होती. 2008 आणि 2012 ऑलिम्पिकमध्ये त्या भारतीय टीमच्या कोच होत्या.