भारतीय पुरुष हॉकी टीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार प्रदर्शन केलं. भारताने स्पेनला 2-1 ने हरवून कांस्य पदक जिंकलं. ऑलिम्पिक इतिहासातील हॉकीमधलं भारताच हे 13 व मेडल आहे. 52 वर्षानंतर भारतीय हॉकी टीमने सलग दोन मेडल जिंकण्याची कामगिरी केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने जिंकलेल ब्रॉन्झ मेडल, 2011 मधील टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजय आणि 2014 मधील जर्मनीचा फुटबॉलमधील वर्ल्ड कप विजय यात एक समानता आहे. ते म्हणजे मायकल हॉर्न हे नाव. या व्यक्तीने तिन्ही मोठ्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावलीय.
भारताने 2011 साली 28 वर्षांनी वनडे वर्ल्ड कप जिंकला. जर्मनीने 24 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर 2014 साली फिफा वर्ल्ड कप जिंकला. यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने इतिहास रचला. माइक हॉर्न यांनी या तिन्ही टीमसाठी काम केलय. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले 47 वर्षीय हॉर्न एडवेंचर्स आहेत. खेळाडूंमध्ये जोश भरण्याचा, उत्साह वाढवण्याच काम ते करतात.
तीन दिवसाच्या बूट कॅम्पसाठी स्विर्त्झलँडला
भारतीय हॉकी टीमने पॅरिस ऑलिम्पिकआधी माइक हॉर्न यांच्याकडून ट्रेनिंग घेतली होती. हरमनप्रीत सिंह आणि त्याची टीम तीन दिवसाच्या बूट कॅम्पसाठी स्विर्त्झलँडला गेलेली. त्यांनी भारतीय टीमचा आत्मविश्वास वाढवण्याच काम केलं. माइक हॉर्न यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकी टीमने बरच काम केलं. त्यामुळे ते पुन्हा एकदा ब्रॉन्झ मेडल जिंकण्यात यशस्वी ठरले.
काय केलं या कॅम्पमध्ये?
तीन दिवसाच्या या कॅम्पमध्ये खेळाडूंनी स्विर्त्झलँडच्या बर्नीज ओबरलँड क्षेत्रातील एका गावात सानेनमध्ये पहिली रात्र घालवलेली. दुसऱ्यादिवशी रुजमोंट येथे सायकल चालवली. केबल कारमधून फिरले, वाया फेराटावर चढाई केली. तिसऱ्यादिवशी रॉसिनियरपर्यंत सायकल चालवली.
स्पेशल फोर्समध्ये ट्रेनिंग
हॉर्न यांनी दक्षिण आफ्रिकेच्या स्पेशल फोर्ससह अंगोला येथे गुरिल्ला युद्धात दोन वर्ष सेवा दिली आहे. त्यानंतर अमेजनच्या अभियानाआधी जंगलामध्ये जिवंत कसं रहायच ते शिकण्यासाठी मनौस येथील ब्राझीलच्या विशेष पथकात सहभागी झाले. तिथे त्यांना सापाने दंश केला. त्यामुळे 5 दिवसासाठी अंधत्व आलं होतं. मात्र, तरीही त्यांनी त्या पथकासोबत ट्रेनिंग केली.