Paris Olympics 2024 : स्वप्न मोडलं, ऑलिम्पिकमधून पहिल्याच दिवशी भारतासाठी निराशाजनक बातमी

| Updated on: Jul 27, 2024 | 3:52 PM

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून पहिल्याच दिवशी भारतासाठी निराशाजनक बातमी आहे. काल स्पर्धेचा भव्य शुभारंभ झाला. भारताला नेहमी काही ठराविक खेळांमध्ये हमखास पदकांची अपेक्षा असते.

Paris Olympics 2024 :  स्वप्न मोडलं, ऑलिम्पिकमधून पहिल्याच दिवशी भारतासाठी निराशाजनक बातमी
Paris Olympics 2024
Image Credit source: Getty Images
Follow us on

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेचा शुभारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी आज भारतीय शूटर्सकडून पदकाची अपेक्षा होती. पण त्यांनी निराश केलं. 10 मीटर एयर रायफल मिक्स्ड टीम इवेंटमध्ये भारताच्या दोन्ही जोड्या फायनलसाठी क्वालिफाय करु शकल्या नाहीत. इलावेनिल वलारिवन आणि संदीप सिंह 12 व्या स्थानावर राहिले. रमिता जिंदल आणि अर्जुन बाबुताने सहाव स्थान मिळवलं. रमिता-अर्जुनला एकूण 628.7 गुण मिळाले. त्याचवेळी इलावेनिल-संदीप 626.3 गुण मिळवले.

टॉप-4 टीम्सनीच 10 मीटर एयर रायफल मिक्स्ड टीम इवेंटमध्ये मेडल राऊंडसाठी क्वालिफाय केलं. या इवेंटची फायनल 27 जुलै म्हणजे आज होणार आहे. भारतासाठी आज हाच एक मेडल इवेंट होता. भारताकडून ऑलिंम्पिक गेम्समध्ये पहिल्याच दिवशी मेडल जिंकण्याचा रेकॉर्ड वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या नावावर आहे. चानूने टोक्यो ओलिंपिक 2020 च्या पहिल्याच दिवशी सिल्वर मेडल मिळवलं होतं.

ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताने आतापर्यंत किती मेडल मिळवलीत?

भारताने आतापर्यंत नेमबाजीत एकूण 4 ऑलिम्पिक पदक मिळवली आहेत. मागच्या दोन ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत खातं उघडता आलं नाही. यावेळी नवीन नेमबाजांची संख्या जास्त आहे. यावेळी राष्ट्रीय नेमबाजी महासंघाने टीम निवडताना फॉर्मला प्राधान्य दिलय. मनु भाकर, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, अंजुम मौदगिल आणि इलावेनिल वलारिवान हे नेमबाज सोडून अन्य नेमबाज पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत.