मुंबई – आयपीएलचे (IPL 2022) सामने जसे होतील तशी सामन्यातील रंगत अधिक वाढत आहे. काल झालेल्या सामन्यात अधिक चांगले फटके पाहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल (Delhi Capitals) आणि सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) सामना होता. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉन मैदानात होता. कालच्या सामन्यात दिल्लीचे कॅप्टन ऋषभ पंत याच्याकडून चांगली खेळी होण्याची शक्यता दिसत होती. परंतु काही काळ मैदानावर तो स्थिरावल्यानंतर बाद झाला. त्याने 18 बॉलमध्ये 26 धावा केल्या. त्यामध्ये तीन षटकार आणि एक चौकाराचा समावेश आहे.
✌? Points. ✌? Happy Faces wishing you ???? ????? ??#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #DCvSRH#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals | @davidwarner31 pic.twitter.com/PCHKm2vg6A
हे सुद्धा वाचा— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 5, 2022
विशेष म्हणजे ऋषभ पंतने एका षटकात तीन षटकार लगावले, तेही सलग चेंडूवरती त्यामुळे तो मोठी खेळी साकारेल असं वाटतं होतं. पण श्रेयस गोपालच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. श्रेयस गोपाल सामन्यातील नववं षटक टाकत होता. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर ऋषभ पंतने षटकार लगावले. पण शेवटच्या चेंडूवर श्रेयस गोपालने चेंडू मागच्या बाजूने वळवला, त्यावेळी चेंडू ऋषभ पंतच्या बॅटला लागून विकेट किपरच्या हातात झेल गेला. त्यावेळी ऋषभ पंतचे चाहते नाराज झाले.
पहिला बॉल – 0 धावा
दुसरा बॉल- 6 धावा
तिसरा बॉल – 6 धावा
चौथा बॉल – 6 धावा
पाचवा बॉल – 4 धावा
सहावा बॉल – विकेट
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 3 गडी गमावून 207 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 58 चेंडूत 12 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 92 धावा केल्या. तसेच रोमन पॉवेलने 35 चेंडूंत 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 67 धावांची खेळी केली. वॉर्नर आणि रोमन पॉवेल यांनी चौथ्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. दोघांनी तुफान फलंदाजी केल्याने दिल्लीच्या 207 धावा झाल्या.