लिस्बन: फुटबॉल विश्वात लियोनल मेस्सीच्या बरोबरीने ख्रिस्तियानो रोनाल्डोच नाव घेतलं जातं. मेस्सीसाठी यंदाच वर्ष खास आहे, कारण सरत्या वर्षात त्याने अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकून दिला. पण ख्रिस्तियानो रोनाल्डो असं करु शकला नाही. त्याच्याकडून पोर्तुगालला भरपूर अपेक्षा होत्या. पण तो मेस्सीसारखा वर्ल्ड कप विजेतेपदाचा चमत्कार करु शकला नाही. वर्ल्ड कप विजेतेपदाची हुलकावणी ही कुठल्याही मोठ्या खेळाडूसाठी त्रासदायक असते. ख्रिस्तियानो रोनाल्डोही याला अपवाद नाहीय.
महागड्या गिफ्टमध्ये तुम्ही-आम्ही असा विचार करु
वर्ल्ड कप टुर्नामेंटमधील खराब प्रदर्शनाची सल रोनाल्डोच्या मनात नक्कीच असेल. या कठीण काळात त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने यंदाचा ख्रिसमस रोनाल्डोसाठी खास बनवला. तिने ख्रिस्तियानो रोनाल्डोला एक खास गिफ्ट दिलं. महागड्या गिफ्टमध्ये आपण दागिने, डायमंड, महागड्या मोबाइलचा विचार करतो. पण जॉर्जिनाने तुमच्या-आमच्या कल्पनेपलीकडच गिफ्ट रोनाल्डोला दिलं.
कार गिफ्ट करुनच थांबली नाही, तर तिने….
तिने रोनाल्डोला जगातील सर्वात महागडी, आलिशान सफारीसाठी ओळखली जाणारी रोल्स रॉइस कार (Rolls Royce) गिफ्टमध्ये दिलीय. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यात रोनाल्डोला कार गिफ्ट करण्यापासून ते त्याच्या आलिशान घराच दर्शन घडतं. ती फक्त रोल्स रॉइस कार गिफ्ट करुनच थांबली नाही, तर तिने रोनाल्डोच्या मुलांना सायकल, लुई विटॉनची महागडी गिफ्ट्स भेट म्हणून दिली आहेत.
रोनाल्डोचा चेहरा पाहण्यासारखा होता
जॉर्जिना रॉड्रिग्जने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये रोनाल्डचं भव्य घर आणि ख्रिसमस सेलिब्रेशन दाखवलय. महिन्याभरापूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा मँचेस्टर युनायटेड बरोबरचा करार रद्द झाला. सध्या तो कुठल्याही टीममधून खेळत नाहीय. पण म्हणून नाताळमध्ये तो निराश नाहीय. त्याने कुटुंबासोबत ख्रिसमसचा जोरदार सेलिब्रेशन केलं. जेव्हा जॉर्जिनाने त्याला रोल्स रॉइस गिफ्टमध्ये दिल्याच सांगितलं, तेव्हा रोनाल्डोचा चेहरा पाहण्यासारखा होता. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते.