मुंबई: महिला सायकलपटूने (Women Cyclist) केलेल्या तक्रारीच्या आधारावर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने सायकलिंगच्या राष्ट्रीय कोचवर कारवाई केली आहे. कोच छळ (Harassment by coach) करत असल्याचा आरोप या महिला सायकलपटूने केला होता. तिने या विरोधात साईकडे रितसर तक्रारही नोंदवली होती. बुधवारी साईने (SAI) या कोच बरोबर केलेला करार तात्काळ रद्द केला. साईच्या अंतर्गत तक्रार समितीला प्रथमदर्शनी स्लोवेनियामध्ये असताना या कोचने गैरवर्तन केल्याचं आढळून आलं. स्लोवेनियाला महिला सायकलिस्टची टीम प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी गेली होती. ट्रॅक स्प्रिंट टीमच्या हेड कोच विरोधात अयोग्य वर्तनाचा आरोप केला होता. त्यात तथ्य आढळून आलं, असं साईने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या सायकलपटूने केलेल्या तक्रारीनंतर साईने चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन केली होती. फॉरेन टूर स्लोवेनियाला असताना हा प्रकार घडला होता. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने हा दौरा आयोजित केला होता.
“चौकशी समितीने आपला रिपोर्ट साईकडे सोपवला. त्यात प्रथमदर्शनी महिला खेळाडूने केलेल्या आरोपात सत्यता दिसून आली” असं स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. “सीएफआयच्या शिफारसीवरुन त्या कोचला नियुक्त केलं होतं. साईने त्याच्याबरोबर करार केला होता. साईने त्या तात्काळ त्या कोच बरोबरचा करार रद्द झाला. चौकशी समिती आपला तपास सुरु ठेवेल व अंतिम रिपोर्ट स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाला सोपवेल” असंही स्टेटमेंटमध्ये नमूद केलय.
साईच्या निर्देशावरुन स्लोवानियाला गेलेला चमू आणि आरोपी कोचला दौरा आटोपून तात्काळ मायदेशी परतण्यास सांगितले आहे, असं सीएफआयचे सचिव मनिंनदर पाल यांनी सांगितलं, टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलं होतं. दौऱ्यादरम्यान आरोपी कोचने अनेकदा गैरवर्तन केलं, असा महिला सायकलपटूचा आरोप आहे. 16 मे रोजी सायकलपटूंचा चमू स्लोवानियाला पोहोचला, त्यानंतर आरोपी कोचने हॉटेल रुम शेअर करण्यासाठी तगादा लावला होता. 29 मे रोजी जर्मनीवरुन स्पर्धा आटोपून परतल्यानंतर परवानगीशिवाय तिच्या रुममध्ये प्रवेश केला होता. 18 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या एशियन ट्रॅक चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी टीम तयार करण्यासाठी सीएफआयने या दौऱ्याचं आयोजन केलं होतं.