तेव्हा मित्रांचे ऐकले असते बरे झाले असते, सानिया मिर्झाला होतोय पश्चाताप, VIDEO होतोय व्हायरला

| Updated on: Jan 27, 2024 | 7:34 PM

sania mirza - shoaib malik : सानिया मिर्झा अखेर शोएब मलिक पासून वेगळी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत्या की, दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे. शोएब मलिकच्या अफेअरमुळे हे नातं तुटल्याचं पाकिस्तानी पत्रकार सांगत आहे. यावरुन त्याला बरेच ट्रोल देखील केले जात आहे.

तेव्हा मित्रांचे ऐकले असते बरे झाले असते, सानिया मिर्झाला होतोय पश्चाताप, VIDEO होतोय व्हायरला
Follow us on

नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक याने अभिनेत्री सना जावेदसोबत विवाह केला आहे. 2010 मध्ये शोएब आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा यांचा विवाह झाला होता. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यात काही ठीक नसल्याचं समोर आलं होतं. अखेर ते समोर आले आहे. शोएब मलिक आणि सना जावेद यांचे गेल्या ३ वर्षापासून अफेअर होतं. त्यामुळेच सानियाने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. शोएब मलिकने जेव्हा तिसऱ्या लग्नाचा फोटो शेअर केला तेव्हा अनेकांना धक्का बसला.

सानियाला होतोय पश्चाताप

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचे लग्न झाले तेव्हा त्याची खूप चर्चा झाली होती. सानिया मिर्झाला अनेकांनी तेव्हा ट्रोल केले होते. लग्नाआधी सानियाचे मित्र आणि जवळचे लोक तिला हा विवाह करु नको म्हणून सांगत होते. पण सानियाने सर्वांच्या विरोधात जाऊन हे लग्न केले होते. पण आज तिला याचा पश्चाताप होत आहे. पाकिस्तानी पत्रकार नईम हनिफ यांनी हा खुलासा केला आहे. एका शोमध्ये त्यांनी सांगितले की, शोएब आणि सनाच्या लग्नानंतर सानिया मिर्झाशी ते फोनवर बोलले.

सानियाचे काय झाले असे विचारले असता नईम हनिफ म्हणाले – सानियाने सांगितले की, 14 वर्षांपूर्वी तिच्या जवळच्या लोकांचा सल्ला ऐकला असता तर बरे झाले असते. हे खूप दुःखद आहे. मला लग्न करण्यापासून रोखणाऱ्या माझ्या मित्रांचे मत मी स्वीकारायला हवे होते.

शोएबचे कुटुंबही खूश नाही

शोएब मलिकचे कुटुंबही त्याच्या या तिसऱ्या लग्नावर खुश नाही. नईम हनीफ यांनी दावा केला की, त्यांची आई, बहीण आणि भावजय यापैकी कोणीही लग्नाला उपस्थित नव्हते. सानियाला शोएबच्या कुटुंबाशी कोणतीही अडचण नाही.

सानिया मिर्झाला पाकिस्तानातून पाठिंबा मिळत आहे. शोएब मलिकने केलेल्या तिसऱ्या लग्नावर त्याला ट्रोल केले जात आहे. सानिया मिर्झाला चीट केल्यामुळे पाकिस्तानी लोकं शोएब मलिक आणि सना जावेद दोघांवर टीका करत आहेत.

पाकिस्तानातील एका वरिष्ठ पत्रकाराने शोएब मलिक आणि सना जावेद यांच्यातील अफेअरबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.