Sania Mirza : प्रसिद्ध टेनिस स्टार सानिया मिर्जा तिच्या करिअर बरोबरच तिच्या कुटुंबाकडेही विशेष लक्ष देत आहे. शोएब मलिकशी तलाक झाल्यापासून सानियाचं कुटुंबाकडचं लक्ष अधिक वाढलं आहे. सानिया सध्या लंडनमध्ये आहे. तिने नुकतेच तिच्या सोशल मीडिया हँडवरल मुलगा इजहान मलिक आणि बहीण अनम मिर्जा हिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर फॅन्सने प्रचंड कमेंट्स केल्या आहेत. सानियासाठी इजहान खास आणि सर्वस्व आहे. इजहानचे फोटो पाहून हा तर हुबेहुब शोएब मलिक सारखा दिसतोय, अशा प्रतिक्रिया यूजर्सने दिल्या आहेत.
गेल्याच वर्षी सानिया आणि क्रिकेटपटू शोएब मलिकने तलाक घेतला होता. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला होता. सना त्याची तिसरी बायको आहे. तर सानियाने सुद्धा आपलं आयुष्य मुव्ह ऑन केलं आहे. तीही तिचं सिंगल आयुष्य एन्जॉय करत आहे. मुलाला अधिकाधिक वेळ देत आहे.
सानिया प्रत्येक आठवड्याला आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत असते. संपूर्ण आठवड्याचे फोटो ती इन्स्टावर शेअर करत असते. सानिया नुकतीच तिचा मुलगा इजहान आणि तिच्या मित्रांसोबत लंडनला फिरायला गेली होती. यावेळी तिने लंडनमध्ये प्रचंड धमाल केली. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोत सानिया कधी मुलासोबत सेल्फी घेताना दिसतेय तर कधी लंडनच्या रस्त्यावर आपल्या मित्रांसोबत फिरताना दिसत आहे. तिने यूकेच्या कॉफी आणि चॉकलेटचाही भरपूर आनंद घेतला आहे. सोशल मीडियावर फोटो टाकून त्यावर तिने काळजाला चिरणारी पोस्टही शेअर केली आहे. माझ्या फेव्हरेटच्या सोबत बदलणाऱ्या दृश्यांना पाहिलंय, असं तिने म्हटलं आहे.
सानियाने मुलाचा फोटो शेअर करताच हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सानियाला पुन्हा एकदा आनंदी पाहून चाहते समाधान व्यक्त करत आहेत. इजहान मलिक हुबेहुब त्याचे वडील शोएब मलिक सारखा दिसत आहे, असं एका फॅनने म्हटलंय. बाकीच्या नेटकऱ्यांनीही तेच म्हटलं आहे.
शोएबशी निकाह केल्यानंतर सानिया मिर्जा पाकिस्तानात राहायला गेली नव्हती. दोघेही दुबईत राहत होते. आता तलाकनंतर शोएबने ते घर सोडलं आहे. सानियानेही दुबईत दुसरं घर घेतलं आहे. सानिया आता दुबईत मुलगा इजहान मलिकसोबत राहते. सानियाची दुबईत एक स्पोर्ट्स अकादमीही आहे.