सानिया मिर्झाच्या बहिणीचा ही झालाय घटस्फोट, या क्रिकेटरच्या मुलासोबत केला दुसरा विवाह

| Updated on: Jan 31, 2024 | 2:55 PM

Mirza sisiters : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झाल्याने दोघांचे चाहते नाराज आहेत. सानिया मिर्झा हिला एक बहिण देखील आहे. जी सोशल मीडियावर एॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. सानिया मिर्झाच्या बहिणीचा देखील घटस्फोट झाला असून तिचा दुसरा विवाह माजी क्रिकेटरच्या मुलासोबत झाला आहे.

सानिया मिर्झाच्या बहिणीचा ही झालाय घटस्फोट, या क्रिकेटरच्या मुलासोबत केला दुसरा विवाह
Follow us on

Sania Mirza Sister : सानिया मिर्झा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिचा शोएब मलिक सोबत घटस्फोट झाला आहे. यामुळे सानिया मिर्झा आणि शोएब या दोघांच्या फॅन्स त्यांच्यावर नाराज आहेत. पण मिर्झा घराण्यात हे पहिल्यांदाच घडत नाहीये हे खूप कमी लोकांना माहीत आहे. सानियाची बहीण अनम हिचा देखील घटस्फोट झाला होता. आता मात्र दुसऱ्या लग्नानंतर अनम सुखी वैवाहिक जीवन जगत आहे.

सानिया मिर्झा तिच्या ग्लॅमरस लूकमुळेही चर्चेत असते. सानियाचे स्टायलिश कपडे तिची धाकटी बहीण अनम मिर्झा हिच डिझाइन करते. अनम मिर्झा सानियाच्या धाकट्या बहिणीच्या भूमिकेत दिसत असली तरी ती एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही.

अनम मिर्झा ही फॅशन डिझायनर

सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्झा ही फॅशन डिझायनर आहे. ती एक फॅशन आउटलेट चालवते. अनमही तिचे आणि सानियाचे पोशाख स्वतः डिझाइन करते. अनम मिर्झा डिझायनर असण्यासोबतच युट्युबर देखील आहे. तिचे यूट्यूब चॅनल देखील खूप लोकप्रिय आहे. ती तिच्या यूट्यूब चॅनलवर अनेक वेगवेगळे अपडेट्स शेअर करत असते.

अनम मिर्झाचे प्रोफेशनल लाईफ ही हिट आहे. ती कोणत्याही मोठ्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. मात्र ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे वादात अडकली होती. अनम मिर्झा तिच्या पहिल्या पतीसोबत घटस्फोटानंतर चर्चेत आली होती.

अनम मिर्झा हिचे पहिले लग्न 2018 मध्ये हैदराबादमधील उद्योगपती अकबर रशीद यांच्यासोबत झाले होते. मोठ्या थाटामाटात दोघांचा विवाह पार पडला होता. या लग्नाला सलमान खानसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या 2 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. पण घटस्फोटाचे कारण मात्र समोर येऊ शकले नाही.

2019 मध्ये असदुद्दीनसोबत दुसरे लग्न

पहिल्या पतीसोबत घटस्फोटानंतर तिच्या आयुष्यात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा मोहम्मद असदुद्दीन आला. दोघेही एकमेकांना डेट करत असताना विवाह बंधनात अडकले. अनमने 2019 मध्ये असदुद्दीनसोबत दुसरे लग्न केले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

लग्नाच्या तीन वर्षांनंतर अनम आणि असद यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. तिचे नाव त्यांनी दुआ असे ठेवले आहे. अनम मिर्झा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर ३ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. अनम मिर्झा आणि तिची बहीण सानिया मिर्झा दोघे ही एकमेकांच्या खूप जवळ आहेत.  अनम तिच्या यूट्यूब चॅनलवरून मोठी कमाई करते.