अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील क्वालिफायर 2 (Qualifier 2) सामना रविवारी 8 नोव्हेंबरला खेळण्यात आला. हा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunriser Hyderabad)यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने हैदराबादवर 17 धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली. मार्कस स्टोयनिस आणि ‘गब्बर’ शिखर धवन दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. शिखरने या सामन्यात 50 चेंडूत 78 धावांची खेळी केली. यामध्ये शिखरने 6 चौकार आणि 2 षटकार खेचले. या खेळीसह शिखरने रोहित शर्माला मागे टाकत चौथा क्रमांक पटकावला आहे. Shikhar Dhawan overtakes Rohit Sharma to jump to fourth spot in IPL most run scorer
शिखर धवनने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रोहितला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. शिखरची या मोसमात बॅट चांगलीच तळपळी. शिखर या मोसमाच्या सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी करतोय. शिखरने या मोसमात सलग 2 शतकं लगावण्याचा पराक्रम केला.
सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली अव्वल क्रमांकावर आहे. विराटने आयपीएलमध्ये 5 हजार 878 धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर मिस्टर आयपीएल सुरेश रैना आणि हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर विराजमान आहे. सुरेश रैनाने एकूण 5 हजार 368 धावा केल्या आहेत. तसेच 5 हजार 254 धावांसह वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर झेप घेतलेल्या धवनच्या नावावर 5 हजार 182 धावांची नोंद आहे. तर 5 हजार 162 धावासंह पाचव्या क्रमांकावर रोहितचा नंबर आहे.
शिखरने या मोसमातील एकूण 16 सामन्यात 145.65 च्या स्ट्राईक रेटने आणि 46.38 च्या सरासरीने 603 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएलच्या 13 व्या मोसमातील अंतिम सामना मंगळवारी 10 नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे. फायनलमध्ये पोहचण्याची मुंबईची ही सहावी तर दिल्लीची पहिली वेळ आहे. मुंबईने याआधी 4 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. तसेच मुंबईने या मोसमातील साखळी फेरीतील 2 आणि क्वालिफायर 1 अशा पद्धतीने 3 वेळा दिल्लीचा पराभव केला आहे. त्यामुळे मुंबई दिल्लीवर वरचढ ठरली आहे. मात्र तरीही या अंतिम सामन्यात कोणता संघ वरचढ ठरणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या :
Photo | MI Vs DC आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईचं पारडं जड करणाऱ्या 5 गोष्टी
IPL FINAL 2020, MI vs DC : पर्पल कॅपसाठी कगिसो रबाडा आणि जसप्रीत बुमराहमध्ये कडवी झुंज
Shikhar Dhawan overtakes Rohit Sharma to jump to fourth spot in IPL most run scorer