Shoaib Akhtar | वयाच्या 48 व्या वर्षी शोएब अख्तर तिसऱ्यांदा बाप, मुलगा की मुलगी? जाणून घ्या

| Updated on: Mar 02, 2024 | 9:15 AM

Shoaib Akhtar | शोएब अख्तर याच्या पत्नीने दिला तिच्या बाळा जन्म, वयाच्या 48 व्या वर्षी शोएब झाला बाप... मुलगा की मुलगी? जाणून घ्या... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शोएब अख्तर आणि त्याच्या कुटुंबाची चर्चा...

Shoaib Akhtar |  वयाच्या 48 व्या वर्षी शोएब अख्तर तिसऱ्यांदा बाप, मुलगा की मुलगी? जाणून घ्या
Follow us on

मुंबई | 2 मार्च 2024 : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर वायाच्या 48 व्या वर्षी तिसऱ्यांदा बाप झाला आहे. ज्यामुळे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शोएब अख्तर याची चर्चा रंगली आहे. शोएबची पत्नी रुबाब खान हिने 1 मार्च रोजी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. शोएब अख्तर आणि रुबाब खान यांना तिसरी मुलगी झाली आहे. शोएब आणि रुबाब यांना दोन मुलं आहे. त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव मोहम्मद मिकाइल अली आणि दुसऱ्या मुलाचं मोहम्मद मुजद्दिद अली असं आहे.

शोएब आणि रुबाब यांनी 2014 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर 2016 मध्ये शोएब आणि रुबाब यांनी मोठा मुलगा मोहम्मद मिकाइल अली याला जन्म दिला. त्यानंतर 2019 मध्ये दोघांनी दुसरा मुलगा मोहम्मद मुजद्दिद अली याला जन्म दिला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शोएब अख्तर याच्या कुटुंहबाची आणि नुकताच जन्मलेल्या लेकीची चर्चा रंगली आहे.

सर्वात म्हत्त्वाची गोष्ट म्हणजे, 1 मार्च 2003 मध्ये वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना झाला होता. हा सामना फार रंजक ठरला होता. सेंच्युरियन येथील सुपर स्पोर्ट्स पार्कमध्ये हा अविस्मरणीय सामना खेळला गेला. भारताने सुपर सिक्समध्ये आपले स्थान आधीच पक्के केलं होतं, तर पाकिस्तानला पुढच्या फेरीत जाण्यासाठी विजय आवश्यक होता.

सलामीवीर सईद अन्वरच्या शानदार शतकाच्या जोरावर पाकिस्तानने निर्धारित 50 षटकांत 273/7 अशी आव्हानात्मक स्कोर स्वतःच्या नावावर केले. मात्र, सचिनच्या 75 चेंडूत 98 धावांच्या खेळीमुळे भारताने 6 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात शोएब अख्तरने 10 षटकात 72 धावा देऊन एक विकेट घेतली.

1 मार्च 2003 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये रंगलेला सामना आणि 1 मार्च 2024 मध्ये शोएब अख्तर याच्या मुलीचा जन्म झाला. सध्या अनेक चाहते आणि सेलिब्रिटी देखील माजी क्रिकेटपटूला शुभेच्छा देत आहेत. फक्त चाहत्यांनी नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी आणि क्रिकेट विश्वातील खेळाडूंनी देखील शोएब याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सांगायचं झालं तर, शोएब अख्तर कामय कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्याने अनेकदा भारताबद्दल देखील वादग्रस्ट वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आलं.