सिकंदर शेख महाराष्ट्र केसरीच्या सेमिफायनलमध्ये पराभूत, पराभवानंतर कुस्तीपटू सिकंदरची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Jan 15, 2023 | 10:29 PM

मला हरविलं की जाणूनबुजून हरविलं ते सगळ्यांनी बघितलं आहे. कुणी फ्रंट साईडचा व्हिडीओ पाहिला तर कुणी बॅग साईडचा व्हिडीओ पाहिला. बॅक साईडचा व्हिडीओ पाहिला त्यांना चार पॉईंट दिसलेले नाहीत.

सिकंदर शेख महाराष्ट्र केसरीच्या सेमिफायनलमध्ये पराभूत, पराभवानंतर कुस्तीपटू सिकंदरची पहिली प्रतिक्रिया
सिकंदर शेख
Follow us on

पुणे : महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesari) सेमिफायनलमध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध सिकंदर शेख (Sikandar Shaikh) असा सामना झाला. या सामन्यात सिकंदर पराभूत झाला. कशामुळं हा पराभव झाला. सोशल मीडियावर हा ट्रेड होत चाललाय. सिकंदर शेख म्हणाला, मी काय सांगितलं हे सोशल मीडियावर पोहचलं आहे. मला काल रात्रीपासून खूप जणांचे कॉल येत आहेत. मोबाईल स्वीच ऑफ करून टाकला आहे. खूप कॉल आले आहे. इंस्टा, फेसबूक, व्हॉट्सअप या माध्यमातून मेसेज येत आहेत. कुस्तीत नेमकं काय झालं. हे सगळ्यांना दिसतं की कुस्तीत काय झालं.

झालं गेलं विसरून जावं

मला सगळे जण विचारत आहेत. मला विचारण्यापेक्षा जी कमिटी आहे त्यांना विचारा हे कशामुळं आणि काय झालं. चार पॉईंट का दिले. मी कोल्हापूरला निघत होतो. पण, मला सांगितल्यामुळं मी येथे आलो. झालं गेलं ते विसरून जावे. पुढच्या पुढं आपण बघुया, असं सिकंदर शेख यानं सांगितलं.

सोशल मीडियावर चर्चा सुरू

सिकंदर हरला नसल्याचं सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. याबद्दल बोलताना सिकंदर शेख यानं सांगितलं की, मी सोशल मीडियावर पहिल्यापासून आहे. महाराष्ट्र केसरी पहिल्या वर्षीपण खेळलो होतो. गेल्या वर्षी प्रकाशनं हरविलं. यावर्षी महेंद्रनं हरविलं.

बॅक साईडच्या व्हिडीओत काय

मला हरविलं की जाणूनबुजून हरविलं ते सगळ्यांनी बघितलं आहे. कुणी फ्रंट साईडचा व्हिडीओ पाहिला तर कुणी बॅग साईडचा व्हिडीओ पाहिला. बॅक साईडचा व्हिडीओ पाहिला त्यांना चार पॉईंट दिसलेले नाहीत. फ्रंट साईडनं पाहिलेल्यांचे चार पॉईंट झाले आहेत.

रेफरी माझ्या बॅग साईडला

रेफरी माझ्या बॅग साईडला उभे आहेत. ते फ्रंट साईडला नाहीत. त्यांना जे समजलं ते त्यांनी सांगितलं. मी सांगू शकत नाही की, आहेत की, नाही. सर्व सोशल मीडियावर सुरू आहे. ते मी सांगण्याचा उपयोग नाही.