मुंबई : कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये (India tour of England) पोहोचला आहे. भारताला या इंग्लंड दौऱ्यात एकूण सहा कसोटी सामने खेळायचे आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका विराटसेना खेळेल. 18 जून ते 23 जून दरम्यान भारतीय संघ न्यूझीलंडशी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दोन हात करेल. ही मॅच साऊथहॅम्प्टन येथे होणार आहे आणि त्यानंतर भारताची गाठ इंग्लंडशी पडणार आहे. तत्पूर्वी भारताचे महान खेळाडू आणि क्रिकेट समालोचक सुनील गावस्कर यांनी मोठी भविष्यवाणी केलीये. (Sunil Gavaskar prediction India will beat England 4-0)
भारत इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशा फरकाने हरवेल, अशी मोठी आणि महत्त्वाची भविष्यवाणी सुनील गावस्कर यांनी केली आहे. द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत सुनील गावस्कर यांनी ही भविष्यवाणी केलीये. इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पनेसरने प्रथम भारतीय संघ 5-0 अशा फरकाने जिंकेल, अशी भविष्यवाणी केली होती. त्यानंतर आता गावस्करांनी भविष्यवाणी केली आहे.
गावस्कर म्हणाले, “भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 जून ते 23 जून दरम्यान होणार आहे. हा सामना झाल्यानंतर जवळपास चार ते पाच आठवड्यांनी भारताला इंग्लंड विरुद्धची मालिका खेळायची आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याच्या निकालाचा कोणताही परिणाम भारतीय संघावर होणार नाही आणि त्याचमुळे भारतीय संघ कोणत्याही दडपणाशिवाय खेळेल. भारतीय संघातले सगळेच खेळाडू सध्या तुफान फॉर्मात आहेत. इंग्लंड विरुद्धची मालिका भारत 4-0 अशा फरकाने जिंकेल”
“भारतीय संघ अतिशय योग्य वेळी इंग्लंडचा दौरा करत आहे. कारण भारतीय संघातले सगळेच खेळाडू तुफान फॉर्मात आहेत. ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमधील वातावरणात गरमी असेल. याचाच फायदा भारतीय संघ घेऊ शकतो. संघात दोन फिरकीपटूंना संधी देऊन इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 5-0 म्हणजेच क्लिन स्वीप देण्याची धमक भारतीय संघात आहे, अशी भविष्यवाणी माँन्टी पनेसरने केली प्रथमत: केली होती.
(Sunil Gavaskar prediction India will beat England 4-0)
हे ही वाचा :
Photo : विराट कोहली-अनुष्का शर्माचं मुंबईतलं घर कसं आहे? पाहा फोटो…
इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाच्या या खेळाडूने म्हटलं, ‘मला झोप येत नाही!’