सिडनी: ऑस्ट्रेलियाची T20 लीग बिग बॅशची धमाकेदार सुरुवात झाली आहे. पहिला सामना कॅनबराच्या मनुका ओव्हलमध्ये झाला. सिडनी थंडर्सने मेलबर्न स्टार्सवर एक विकेटने विजय मिळवला. या रोमांचक सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. एकवेळ सामना मेलबर्न स्टार्सच्या बाजूने झुकला होता. पण सिडनी थंडरच्या गुरिंदर संधूच्या बॅटिंगने सामना पलटला. मेलबर्न स्टार्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी फक्त 122 धावा केल्या. प्रत्युत्तरात सिडनीच्या टीमने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.
शेवटच्या ओव्हरमध्ये सिडनीला 8 धावांची आवश्यकता होती. त्यांचे 3 फलंदाज बाकी होते. शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडलं? तो थरार जाणून घेऊया.
शेवटच्या ओव्हरचा रोमांच
पहिला चेंडू – वेबस्टरच्या चेंडूवर ख्रिस ग्रीनने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण सब्सिटीट्यूट खेळाडू ब्रॉडी काऊचने लॉन्ग ऑफवर जबरदस्त कॅच पकडली.
दुसरा चेंडू – फजलाक फारूकीला वेबस्टरने दुसऱ्या चेंडूवर बोल्ड केलं. सिडनी थंडरला 4 चेंडूत 8 धावांची आवश्यकता होती. त्यांचा एक विकेट बाकी होता.
तिसरा चेंडू – डॉजेटने मिड ऑनच्या दिशेला शॉट खेळून एक धाव घेतली. त्यावेळी गुरिंदर संधू स्ट्राइकवर आला.
चौथा चेंडू – वेबस्टरच्या चौथ्या चेंडूवर गुरिंदर संधूने मिडविकेटच्यावरुन षटकार खेचला. संधूच्या या फटक्यामुळे सिडनी थंडरने पुन्हा मॅचमध्ये पुनरागमन केलं. आता सिडनीला 2 चेंडूत फक्त 1 रन्सची गरज होती.
पाचवा चेंडू – वेबस्टरच्या पाचव्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही. बोल्टने सुंदर फिल्डिंग केली.
सहावा चेंडू – वेबस्टरने एका सुंदर चेंडू टाकला. संधू त्या चेंडूला स्पर्श करु शकला नाही. पण विकेटकीपरने हा चेंडू सोडला. अखेरीस सिडनी थंडरला बायचा चौकार मिळाला व त्यांनी सामना जिंकला.
An utterly absurd finish to the #BBL12 season opener! Here’s how the final over unfolded…#TheFinish | @BKTtires pic.twitter.com/vHiB9kPYRQ
— cricket.com.au (@cricketcomau) December 13, 2022
संधू बनला विजयाचा हिरो
गुरिंदर संधूला प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळाला. त्याने 16 चेंडूत 20 धावा केल्या. याशिवाय 23 धावा देऊन 2 विकेट काढल्या.