Team India : ऑस्ट्रेलियाचं मैदान गाजवणारा टीम इंडियाचा हा खेळाडू पडला वहिनीच्या बहिणीच्या प्रेमात

| Updated on: Nov 05, 2024 | 11:45 AM

Team India : प्रेम कोणावरही होऊ शकतं. यात कुठलं बंधन नसतं. टीम इंडियाचा खेळाडू सुद्धा अशाच एक मुलीच्या प्रेमात पडला. त्याचा आपल्या वहिनीच्या बहिणीवर जीव जडला. आम्ही ज्या खेळाडूबद्दल बोलतोय तो सध्या ऑस्ट्रेलियात भेदक गोलंदाजी करतोय.

Team India : ऑस्ट्रेलियाचं मैदान गाजवणारा टीम इंडियाचा हा खेळाडू पडला वहिनीच्या बहिणीच्या प्रेमात
Team India player
Image Credit source: instagram
Follow us on

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. टीम इंडिया 10 नोव्हेंबरला रवाना होणार आहे. काही खेळाडू आधीच ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचले आहेत. हे खेळाडू इंडिया ए टीमसोबत गेले आहेत. यात मुकेश कुमार हा वेगवान गोलंदाज सुद्धा आहे. मुकेश कुमारचा वहिनीच्या बहिणीवर जीव जडला. त्याने तिच्यासोबत थेट लग्न केलं. इंडिया ए सोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला मुकेश कुमार बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्माच्या टीम इंडियाचा भाग नाहीय. इंडिया ए कडून खेळताना मुकेश कुमार ऑस्ट्रेलियन विकेट्सवर भेदक गोलंदाजी करतोय. त्याच्या गोलंदाजीबद्दल बोलण्याआधी त्याची प्रेम कहाणी जाणून घेऊया. तो कसा वहिनीच्या बहिणीच्या प्रेमात पडला?

मुकेश कुमार बिहारच्या गोपालगंजचा राहणारा आहे. त्याचं मागच्यावर्षी लग्न झालं. दिव्या नावाच्या ज्या मुलीबरोबर त्याचं लग्न झालं, ती त्याच्या वहिनीची बहिण आहे. म्हणजे मुकेश कुमारच्या मोठ्या भावाची मेहुणी. मुकेश आणि दिव्याची शाळेपासून ओळख आहे. जिच्याबरोबर पहिलं प्रेम झालं, तिलाच मुकेशन आयुष्यभराची जोडीदार म्हणून निवडलं. लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये मीडियाशी बोलताना त्याने सांगितलेलं की, दिव्या त्याच्या वहिनीची लहान बहिण आहे.


ऑस्ट्रेलियन विकेट्सवर करतोय आग ओकणारी गोलंदाजी

मुकेश कुमार सध्या इंडिया ए सोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तो तिथे इंडिया ए साठी पहिली मॅच खेळला. तो सामना इंडिया ए ने गमावला. पण मुकेश कुमारने आपली छाप उमटवली. पहिल्या इनिंगमध्ये इंडिया ए चा डाव 107 धावांवर आटोपला. मुकेश कुमारने पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेट काढले. गोलंदाजीत त्याच्या कमालीच्या प्रदर्शनाच्या बळावर ऑस्ट्रेलिया ए चा सुद्धा पहिला डाव 195 धावांवर आटोपला. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये मुकेश कुमारने एक विकेट काढला. अशा प्रकारे या सामन्यात त्याच्या नावावर 7 विकेट जमा झाले. पण इंडिया ए हा सामना जिंकू शकली नाही.