टीम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्माला दिल्ली विमानतळावर वाईट वागणूक मिळाल्याच प्रकरण समोर आलय. भारताच्या ओपनरने दिल्ली विमानळतावर जे काही घडलं, ते सोशल मीडियावर सांगितलय. अभिषेक शर्मानुसार हा प्रकार इंडिगो आणि त्यांच्या स्टाफच्या वर्तणुकीशी संबंधित आहे. त्याने काऊंटर मॅनेजरची तक्रार केली आहे. इतका वाईट अनुभव याआधी कधीही आला नाही, असं अभिषेक शर्माने म्हटलं आहे. यापेक्षा अजून वाईट काही झालं नसतं, असं तो म्हणाला.
भारताचा ओपनर अभिषेक शर्मासोबत विमानतळावर काय झालं? ते त्याच्याकडून जाणून घेऊया. अभिषेकनुसार, तो योग्य वेळी योग्य काऊंटरवर पोहोचला होता. मात्र, तरीही उगाचच काऊंटर मॅनेजरने त्याला एका काऊंटरवरुन दुसऱ्या काऊंटरवर जायला सांगितलं. अभिषेकने सांगितलं की, या भानगडीत त्याचं विमान सुटलं. त्याने खासकरुन काऊंटर मॅनेजर सुष्मिता मित्तलच नाव घेतलय. अभिषेकच्या म्हणण्यानुसार, तिचा वर्तन सहन करण्यापलीकडे होतं.
अजून काय म्हणाला?
अभिषेक म्हणाला की, त्याच्याकडे फक्त एक दिवसाची सुट्टी होती. पण विमान सुटल्यामुळे ती सुट्टी वाया गेलीय. यापेक्षा वाईट हे झालं की, इंडिगोकडून दुसरी कुठलीही मदतही मिळवून देण्यात आली नाही. आतापर्यंत वेगवेगळ्या एअर लाइन्ससोबत प्रवास केला, त्यात हा सर्वात वाईट अनुभव असल्याचे अभिषेकने म्हटलं आहे.
नुकतीच टीम इंडियात निवड
अभिषेक शर्माची इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या T20 सीरीजसाठी टीम इंडियात निवड झालीय. संजू सॅमसनसोबत तो इंग्लंड विरुद्ध इनिंगची सुरुवात करताना दिसेल अशी अपेक्षा आहे. अभिषेक शर्माचा सध्याचा फॉर्म शानदार आहे. त्याने सैयद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी या स्पर्धांमध्ये चांगल्या धावा केल्या आहेत. या देशांतर्गत स्पर्धांमध्ये धावा करणाऱ्या टॉप 10 फलंदाजांमध्ये तो आहे. तोच फॉर्म इंग्लंड विरुद्ध कायम राहिल अशी त्याला अपेक्षा आहे.