भारताला टोकियो ऑलम्पिकमध्ये दुसरं रौप्य, रवीकुमार दहियानं इतिहास रचला, नरेंद्र मोदींकडून ट्विट करत अभिनंदन

| Updated on: Aug 05, 2021 | 6:24 PM

भारताला टोकिया ऑलम्पिकमध्ये दुसरं रौप्य, रवीकुमार दहियानं इतिहास रचला

भारताला टोकियो ऑलम्पिकमध्ये दुसरं रौप्य, रवीकुमार दहियानं इतिहास रचला, नरेंद्र मोदींकडून ट्विट करत अभिनंदन
Ravi Kumar Dahiya
Follow us on

टोकियो: भारतीय पैलवान रवी दहियाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. कझाकिस्तानच्या सनायेव नूरिस्लामला धोबीपछाड देत रवीने सेमीफायनल सामन्यात 57 किलो वजनी गटात दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरित प्रवेश केला आहे. (wrestler Ravi Dahiya at Tokyo Olympic 2021) अंतिम फेरीत पराभव झाल्यानं रवी दहियाला रौप्य पदक मिळालं आहे. तर, दोन वेळचा विश्वविजेता रशियाच्या जावूर युगुयेवने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.

भारताचा पैलवान रवी कुमार दहिया अगदी स्वप्नवत कामगिरी करत ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. रवीने सेमीफायनलमध्ये कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामला मात देत अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलं होतं. त्याची यंदाच्या स्पर्धेतील कामगिरी पाहता तो भारताचा सुवर्णपदक नक्कीच मिळवून देईल असे वाटत होते. त्याने अंतिम सामन्यात खेळही तसाच केला. अगदी चुरशीच्या झालेल्या सामन्यात अखेर वेळेची मर्यादा असल्चाने रवी 3 गुणांनी कमी पडला आणि 7-4 ने त्याच्या हातातून सुवर्णपदक निसटलं

नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंंदन


रवीकुमार दहिया हा अप्रतिम कुस्तीपटू आहे. लढण्याच त्यानं दाखवलेलं स्पिरीट अतुलनीय आहे. रौप्य पदक मिळवल्याबद्दल अभिनंदन करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
 

इतर बातम्या:

Tokyo Olympic 2020 : ‘चक दे इंडिया’, 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक, भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय

Tokyo Olympic 2021 : पैलवान रवी दहियाची धडाकेबाज कामगिरी, कुस्तीत रौप्य पदकाची कमाई