नीरजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, जागतिक क्रमवारीत गरुडझेप

| Updated on: Aug 12, 2021 | 2:24 PM

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरजचं देशभरातून कौतुक होत आहे. त्याला कोट्यवधींची बक्षीसं मिळाली आहेत.

नीरजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, जागतिक क्रमवारीत गरुडझेप
नीरज चोप्रा
Follow us on

मुंबई : भारताला एथलेटिक्समध्ये सुवर्णपदक मिळवून देत नीरज चोप्राने (Neeraj Chopra) स्वत:सह कोट्यवधी भारतीयांच स्वप्न पूर्ण केलं. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) नीरजने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 87.53 मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदकाला गवासनी घातली. त्याच्या आसपासही कोणता खेळाडू पोहचू शकला नसल्याने त्याने दिमाखात सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. भालाफेक खेळातील हा सर्वोच्च मान मिळाल्यानंतर नीरजने जागतिक क्रमवारीतही आपल्यासह देशाचं नाव वर पोहचवत थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

नीरजने पुरुष भालाफेकीच्या जागतिक क्रमवारीत 1315 गुण मिळवत थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्याच्या पुढे केवळ जर्मनीचा जोहान्स हा 1396 गुणांसहित पहिल्या क्रमांकावर आहे. नीरजच्या या कामगिरीमुळे सर्वच स्तरातून त्याचं कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वीच नीरजने त्याच्या आगामी प्लॅनबद्दलही सांगितलं होतं.  87.53 मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता आता लक्ष्य 90 मीटर भाला फेंकत वर्ल्ड रेकॉर्ड तोडनं असल्याचं तो म्हणाला होता.

असं मिळवलं नीरजनं सुवर्णपदक

भालाफेकीत नीरज चोप्राने सुरुवातच धडाकेबाज केली. नीराजने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. दुसऱ्या वेळी त्याने 87.58 मी इतका लांब भाला फेक करुन आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं. तिसऱ्या थ्रोमध्ये 76.79 मीटर थ्रो फेकला तरी अद्यारपही त्याची आघाडी कायम होती. त्यानंतर त्याचा चौथा आणि पाचवा थ्रो फाऊल ठरला. पण त्याने सहाव्या प्रयत्नाआधीत सुवर्णपदक खिशात घातलं होतं. त्यामुळे नीरजचा 84 मीटर लांबीचा सहावा थ्रो केवळ औपचारिकता ठरली. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं.

नीरजवर बक्षिसांचा वर्षाव

या ऐतिहासिक विजयानंतर नीरजवर संपूर्ण देशातूंन कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोबतच त्याला कोट्यवधींची बक्षिसंही जाहीर झाली असून यात रोख रकमेसह, गाडी, घर बनवण्यासाठी मोफत सिंमेट, मोफत हवाईयात्रा अशी अनेक बक्षिसं आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आणि सीएसके संघाने नीरजला एक कोटी रुपये रोख रकम बक्षिस म्हणून दिली आहे. तर इंडिगो एअरलाईन्सने देखील नीरजला सुवर्णपदक विजयानंतर एक वर्षापर्यंत मोफतमध्ये अनलिमिटेड विमान प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

गुरुग्राम येथील एका रिअल इस्टेट कंपनीने नीरजला 25 लाख रुपये बक्षिस जाहीर केलं आहे. याशिवाय बांगड़ सिमेंट कंपनीने घर बांधण्यासठी मोफत सिमेंटची घोषणा देखील केली आहे.नीरज चोप्राला महिंद्रा ग्रुपतर्फे नुकतीच मार्केटमध्ये आलेली कार XUV700 देण्याची घोषणा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत केली. या सर्वांसह हरियाणा सरकारने 6 कोटी रुपयांचं बक्षीस आणि क्लास वन दर्जाची नोकरी नीरजला देऊ केली आहे. पंजाब आणि मणिपुर सरकारनेही नीरजला बक्षिसाची घोषणा केली आहे.

इतर बातम्या

सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही

Video: जेव्हा टोकियोच्या मैदानावर तिरंगा फडकला, राष्ट्रगीतानं मैदान दुमदुमलं, पहा गोल्डन बॉय नीरजचा भावूक क्षण

(After winning gold medal at tokyo olympics neeraj chopra becomes world number 2 in men javelin throw)