PHOTO : नीरजच्या एका थ्रोने भालाफेक खेळावरील युरोपियन देशांचे वर्चस्व संपवले, केली नवी सुरुवात
भारताचा सुवर्णवीर नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पार पडलेल्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. नीरजने आपल्या एका थ्रोने अनेक रेकॉर्डही तोडले आहेत.
1 / 5
नीरज चोप्राने ऑलिम्पिक खेळांमध्ये भाला फेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. ही कामगिरी करणारा तो पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे. कायम यूरोपियन देशांतील खेळाडू मिळवत असलेले हे पदक अखेर नीरजने जिंकत देशासह संपूर्ण आशिया खंडाचे नाव भालाफेक खेळात मोठे केले आहे.
2 / 5
नीरज भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा दुसराच कृष्णवर्णीय खेळाडू आहे. य़ाआधी केवळ त्रिनिदादच्या केशोर्न वालकोट याने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं.
3 / 5
मागील 50 वर्षांत केवळ तीनच असे खेळाडू झाले आहेत, ज्यांनी आपल्या पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक खेळात सुवर्णपदक पटकावले आहे. यात हंगेरीच्या मिलकोस नेमेथने 1976 तर जान जेलेजीने 1992 मध्ये ही कामगिरी केली होती.
4 / 5
5 / 5
नीरज चोप्रासाठी हा विजय यासाठीही महत्त्वाचा आहे कारण त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंवर एकतर्फा विजय मिळवला आहे. रौप्य, कांस्य जिंकणाऱ्या खेळाडूंनी त्यांच्या सीजनमधील बेस्ट थ्रो टाकला होता. मात्र ते नीरजने पहिल्या प्रयत्नात केलेल्या थ्रोच्या आसपासही पोहचू शकले नाहीत. अशाप्रकारची कामगिरी करुन नीरजने एक नवा रेकॉर्ड सेट केला आहे.