टोक्यो : जी कामगिरी करण्यासाठी प्रत्येक खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत जातो, ती कामगिरी भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu) दुसऱ्याच दिवशी पूर्ण केली. भारताला टोक्यो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympic) पहिलं पदक मिळवून देत मीराबाईने यश मिळवलं. कामगिरी फत्ते झाल्याने मीराबाई अजिबात वेळ न घालवता लगेच चौथ्याच दिवशी मायभूमीत परतीसाठी निघाली आहे. तिने घरवापसीची फ्लाइट पकडली असूनन ऑलिम्पिकमध्ये चंदेरी कामगिरी करुन आता ती भारतात परतत आहे.
26 वर्षीय मीराबाईने भारताला वेटलिफ्टिंग स्पर्धेत 49 किलोग्राम वजनी गटात भारताला रौप्यपदक मिळवून दिलं. त्यानंतर आता घरी परतण्यासाठी निघालेल्या मीराबाईने ट्वीट करत आपला विमानतळावरील फोटो शेअर केला आहे. या फोटोला ‘मी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण सोबत घेऊन घरी परतत आहे. सर्वांचे धन्यवाद’ असे कॅप्शनही दिले आहे.
Heading back to home ??, Thank you #Tokyo2020 for memorable moments of my life. pic.twitter.com/6H2VpAxU1x
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) July 26, 2021
मीराबाई चानूने 49 किलोग्राम महिला वर्गात कमाल कामगिरी करत रौप्य पदक मिळवलं. तिने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं आहे. मीराबाईने स्नॅच राउंडमध्ये 87 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलत हे यश मिळवलं. तर 49 किलोग्राम वर्गात चीनच्या जजिहु हिने सुवर्ण पदक पटकावलं.
ओलिम्पिक सारख्या भव्य मंचावर मीराबाई चानूने अप्रतिम कामगिरी करत रौप्य पदक मिळवलं. याआधी अशी कामगिरी 21 वर्षांपूर्वी म्हणजे 200 च्या सिडनी ओलिम्पिकमध्ये भारताच्या कर्नम मल्लेश्वरीने केली होती. तिने 69 किलो वर्गात कांस्य पदक जिंकत भारताला वेटलिफ्टिंगमधील पहिलं पदक मिळवून दिलं होतं.
हे ही वाचा :
प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांनीच टाळ्यांचा कडकडाट, मीराबाई मेडल जिंकताना घरी काय घडलं, पाहा VIDEO
(After wInning silver medal in tokyo Olympic Mirabai Chanu coming to India )