नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu) नुकतीच मायदेशी परतली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणाऱ्या मीराबाईचं नवी दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे तिला मणिपूर सरकारने अतिरिक्त पोलीस अधिक्षकपद बहाल केलं आहे.
Weightlifter @mirabai_chanu receives a rousing welcome at Delhi Airport as she returns to India after clinching a silver? medal at #TokyoOlympics
Let’s welcome our champion with a loud cheer?️
Indiaaaaaa…India!#Cheer4India #Tokyo2020 pic.twitter.com/8WFrDSJk1C
— PIB India (@PIB_India) July 26, 2021
चानू तिच्या सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. यावेळी तिने मास्क आणि फेस शील्ड घालत कोरोना नियमांचे पालन केले. दरम्यान भारतात आल्यानंतर तिने ट्विट करत आनंद व्यक्त केला. तिने लिहिले, ‘इतक्या प्रेमासह सपोर्टमुळे मी परत येऊन खूप आनंदी आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.’
Happy to be back here in amidst so much love and support. Thank You so much ?? pic.twitter.com/ttjGkkxlDu
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) July 26, 2021
मीराबाई चानूने 49 किलोग्राम महिला वर्गात कमाल कामगिरी करत रौप्य पदक मिळवलं. तिने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं आहे. मीराबाईने स्नॅच राउंडमध्ये 87 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलत हे यश मिळवलं. तर 49 किलोग्राम वर्गात चीनच्या जजिहु हिने सुवर्ण पदक पटकावलं.
ओलिम्पिक सारख्या भव्य मंचावर मीराबाई चानूने अप्रतिम कामगिरी करत रौप्य पदक मिळवलं. याआधी अशी कामगिरी 21 वर्षांपूर्वी म्हणजे 200 च्या सिडनी ओलिम्पिकमध्ये भारताच्या कर्नम मल्लेश्वरीने केली होती. तिने 69 किलो वर्गात कांस्य पदक जिंकत भारताला वेटलिफ्टिंगमधील पहिलं पदक मिळवून दिलं होतं.
हे ही वाचा :
प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांनीच टाळ्यांचा कडकडाट, मीराबाई मेडल जिंकताना घरी काय घडलं, पाहा VIDEO
(After winning silver medal in tokyo Olympic Mirabai Chanu reached india Manipur Govt appoint her as Additional Superintendent of Police)