मुंबई : जपानची राजधानी टोकियो शहरात आजपासून सुरु झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympics 2020)
सहभागी जगभरातील सर्व खेळाडूंचं मन:पूर्वक अभिनंदन. स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी, स्पर्धेच्या यशस्वितेसाठी हार्दिक शुभेच्छा, असे म्हणत अजित पवारांनी स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. (Ajit Pawar Wishes athletes participating in Tokyo Olympics 2020)
टोकियो ऑलिम्पिकमध्ये 126 खेळाडूंचा भारतीय संघ 18 क्रीडाप्रकारात देशाला पदक जिंकून देण्यासाठी खेळणार आहे. आपल्या महाराष्ट्रातून 1) राही सरनोबत – कोल्हापूर (खेळ-शुटींग-25 मीटर पिस्तूल), 2) तेजस्विनी सावंत – कोल्हापूर (खेळ-शुटींग-50 मीटर), 3) अविनाश साबळ – बीड (खेळ-अॅथलेटिक्स 3000 मीटर स्टिपलचेस), 4) प्रविण जाधव – सातारा (खेळ-आर्चरी), 5) चिराग शेट्टी – मुंबई (खेळ-बॅडमिंटन पुरुष दुहेरी), 6) विष्णू सरवानन – मुंबई (खेळ-सेलिंग), 7) स्वरुप उन्हाळकर – कोल्हापूर (खेळ-पॅरा शुटिंग-10 मीटर रायफल), 8) सुयश जाधव – सोलापूर, (खेळ-पॅरा स्विमर-50 मीटर बटरफ्लाय, 200 मीटर वैयक्तिक मिडले) हे आठ खेळाडू देशाला ऑलिम्पिक पदक जिंकून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतील. आपल्या उत्तम कामगिरीने, खिलाडूवृत्तींने राज्याचा, देशाचा गौरव वाढवतील, असा विश्वास आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो, असं अजित पवार म्हणाले.
उपमख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष असलेल्या अजित पवारांनी ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होत भारतीय संघातील खेळाडूंना, क्रीडा कार्यकर्त्यांना, क्रीडा रसिकांना टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
इतर बातम्या
Tokyo Olympics 2020 Schedule: भारतीय खेळाडू कधी, कुठे आणि केव्हा खेळणार, पाहा पूर्ण शेड्यूल…
Tokyo Olympics 2021 : 24 जुलै भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधील महत्त्वाचा दिवस, ‘हे’ आहे कारण
(Ajit Pawar Wishes athletes participating in Tokyo Olympics 2020)