Tokyo Olympics 2021: भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास, शाहरुखच्या ‘चक दे इंडिया स्टाईल’ शुभेच्छा

| Updated on: Aug 02, 2021 | 5:51 PM

भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 1-0 ने नमवल्यानंतर टोक्यो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. या विजयानंतर महिला खेळाडूंवर सर्व देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

Tokyo Olympics 2021: भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास, शाहरुखच्या चक दे इंडिया स्टाईल शुभेच्छा
भारतीय महिला हॉती संघ विजयी
Follow us on

Tokyo Olympics 20-2021: टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक विजय मिळवत थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. या विजयानंतर देशभरातून महिला हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचा सुपरस्टार शाहरुख खानने (Shahrukh khan tweet) देखील एक खास ट्विट करत महिला खेळाडूंसह त्यांच्या प्रशिक्षकाचे अभिनंदन केले आहे.

सर्वात आधी या अप्रतिम विजयानंतर भारतीय महिला हॉकी संघाचा मुख्य प्रशिक्षक सोर्ड मारिन (Sjoerd Marijne) याने सर्व महिला संघासोबत एक बसमधील फोटो पोस्ट केला. ज्याला त्याने ‘सॉरी फॅमिली मला यायला अजून वेळ लागेल’ असे कॅप्शन दिले. ज्या फोटोला रिट्विट करत शाहरुखने अनोख्या प्रकारे शुभेच्छा दिल्या.

काय म्हणाला शाहरुख?

शाहरुख खानने ट्विटमध्ये संघासह मारिनला शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखने ट्विटमध्ये संघाकडून सुवर्णपदकाची मागणी करत शुभेच्छा देताना स्वत:ला माजी प्रशिक्षक कबीर खान असं मजेत म्हटलं आहे. भारतीय महिला हॉकी संघावर आधारीत ‘चक दे इंडिया’ चित्रपटात शाहरुखने संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका निभावली होती. त्यामुळे त्याने स्वत:ला त्याच कॅरेक्टरमध्ये असल्याचे सांगत ‘चक दे इंडिया’ स्टाईल शुभेच्छा देत महिला खेळाडंचा पुढील सामन्यासाठी आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला.

या ट्विटला मारिन याने पुन्हा रिप्लाय करत तुम्ही देत असलेल्या सहकार्य आणि प्रेमासाठी खूप आभार. आम्ही या सर्वांची नक्कीच परतफेड करेन.

सेमीफायनलमध्ये अर्जेंटीनाशी सामना

कर्णधार रानी रामपालच्या नेतृत्त्वाखाली क्वॉर्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला नमवल्यानंतर आता भारतीय महिलांसमोर अर्जेंटीना संघाचे आव्हान असणार आहे. अर्जेंटीना संघाने क्वॉर्टर फायनलमध्ये जर्मनीला 3-0 ने मात देत सेमीफायनल गाठली आहे. भारत आणि अर्जेंटीना यांच्यातील सेमीफायनलचा सामना 4 ऑगस्ट रोजी होईल. भारतासाठी हा सामना तसा अवघड असणार आहे. याचे कारण अर्जेंटीना संघाचा आक्रमक खेळ आणि वर्ल्ड रँकिंगमध्ये असणारी अप्रतिम पोजीशन आहे.

संबंधित बातम्या 

Women’s Hockey : गोलकीपर सविताने भिंत बनून हल्ले परतवले, गुरजीतने वाऱ्याच्या वेगाने गोल केला, भारत सेमी फायनलमध्ये

Tokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश

PHOTOS : भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी, ‘या’ पाच जणींच्या जोरावर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश

(Bollywood Superstar Shahrukh Khan Congratulates Indian Women Hocky team after reaching in semifinal)