Tokyo Olympic 2021 : भारतीय हॉकी संघातील पंजाबी खेळाडूंची ‘बल्ले बल्ले’, पंजाब सरकारकडून एक कोटींचे बक्षीस

| Updated on: Aug 05, 2021 | 2:19 PM

भारतीय हॉकी संघाने 41 वर्षानंतर नवा इतिहास लिहिला आहे. ऑलिम्पिक खेळांत कांस्य पदक जिंकल्यानंतर संपूर्ण देशातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tokyo Olympic 2021 : भारतीय हॉकी संघातील पंजाबी खेळाडूंची बल्ले बल्ले, पंजाब सरकारकडून एक कोटींचे बक्षीस
भारताने हॉकीमध्ये 41 वर्षानंतर पदक जिंकलं आहे...
Follow us on

Tokyo Olympic 2021 : भारतीय पुरुष हॉकी संघाने तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत जर्मनीला 5-4 ने मात देत कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. या विजयानंतर भारतीयांमध्ये एक वेगळाच आनंद दिसत आहे. काहींनी तर क्रिकेट विश्वचषकापेक्षा हा मोठा विजय असल्याचच म्हटलं आहे. देशाचा राष्ट्रीय खेळ असल्याने हा विजय सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा अनमोल विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंवरही कौतुकांचा वर्षाव होत असतानाच पंजाब सरकारने हॉकी संघात खेळणाऱ्या त्यांच्या राज्यातील खेळाडूंना तब्बल 1 कोटी रुपयांचं रोख बक्षिस जाहिरं केलं आहे.

पंजाबचे क्रिडा मंत्री राणा गुरमीत सोढी यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, ”सर्वच हॉकी संघाचं अभिनंदन! आता हा विजय साजरा करण्याची वेळ आली आहे. पंजाबचा क्रिडामंत्री म्हणून राज्यातील खेळाडूंना आणखी प्रेरणा मिळावी म्हणून मी हॉकी संघातील पंजाबच्या खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं बक्षिस जाहीर करतो. याआधी सोढी यांनी सुवर्णपदक जिंकल्यास प्रत्येकी 2.25 कोटी रुपये देणार असल्याचेही जाहीर केले होते. सोढींसह पंजाबचे मुख्यमंत्री अमरींदर सिंग यांनी देखील संघाचे अभिनंदन केले.

या खेळाडूंना मिळणार बक्षिस

भारतीय पुरुष हॉकी संघात तब्बल 8 खेळाडू हे पंजाबचे आहेत. यामध्ये कर्णधार मनप्रीत सिंगसह हरमनप्रीत सिंग, रुपींदर पाल सिंग, हार्दीक सिंग, दिलप्रीत सिंग, शमशेर सिंग, गुरजंत सिंग आणि मनदीप सिंग यांचा समावेश आहे. या सर्वांना पंजाब सरकारकडून 1 कोटी रुपयांची रोख रक्कम बक्षिस म्हणून दिली जाणार आहे

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2020 Live : भारतीय हॉकी संघाने रचला इतिहास, जर्मनीवर 5-4 ने मात, 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपला! 

Tokyo Olympic 2021 : ‘हा’ खेळाडू ठरला भारतीय हॉकी संघाच्या विजयाचा शिल्पकार, कांस्य पदकासाठी केलं जीवाचं रान

Tokyo Olympic 2021 : ‘तू इतिहास लिहिलासं’, भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराचं पंतप्रधानांकडून कौतुक

(Each punjab player in indian hockey team Got Cash award of 1 crore for punjab government)